काळ आला होता पण वेळ आली नव्हती असं म्हटलं जातं, याच वाक्याला साजेसा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोन दुचाकीस्वार मृत्यूच्या दाढेतून मागे आल्याचं पाहायला मिळतं आहे. या घटनेचा थरारक व्हिडीओ पाहून अनेकजण या दुचाकीस्वारांवरचा मोठा धोका टळल्याचं म्हटलं जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही पाहा- व्हिडीओ शूट करताना ड्रोनच्या आवाजाने भडकली मगर अन् घडलं भलतंच; पाहा Viral video

एका हिंदी वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार, ही घटना उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथील आहे. येथील जंगलातील रस्त्यावरुन जात असताना त्यांच्यासमोर अचानाक एक वाघ येतो. सुदैवाने तो वाघ दिसताच दुचाकीस्वार आपली गाडी वेळीच थांबवतो आणि थोडा मागे येतो. मात्र, या दुचाकीस्वाराला काही क्षणांचा उशीर झाला असता तर ते वाघाची शिकार बनले असते.

हेही पाहा- Video: धबधब्याखाली खेळत असताना पर्यटकांवर काळाने घातला घाला; क्षणात डोळ्यासमोर सगळे पाण्यात…

या व्हिडीओमध्ये बाईकस्वार कसातरी त्याची बाईक मागे घेतो तरीही वाघा त्याच्याकडे डोळे विस्फारून पाहताना दिसत आहे. याच रस्त्याने जंगलाच्या दिशेने जात असलेल्या एका कारचालकाने ही सर्व घटना आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड केली असून या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

मृत्यूच्या जबड्यातून आले माघारी –

Koo App
हाइवे पर अचानक आ गया टाइगर, ऐसे बची बाइक सवारों की जान #Highway #Tiger #ViralVideo #Pilibhit
View attached media content
– Alkesh Kushwaha (@alkeshkushwaha) 22 Dec 2022

व्हिडीओमध्ये वाघाला पाहून दुचाकीस्वार खुप घाबरतो आणि गाडीचा ब्रेक लावतो. शिवाय वाघ समोर असल्याने स्वत:च्या सुरक्षिततेसाठी दुचाकीस्वार आपली बाईक बंद करुन ती पायाने मागे ढकलत असल्याचंही व्हिडीओमध्ये दिसतं आहे. शिवाय वाघालाही हे लोक हल्लेखोर नसल्याचं समजतं त्यामुळे तोदेखील या बाईकस्वारावर हल्ला न करता निघून गेल्याचंही व्हिडीओमध्ये दिसतं आहे.

दरम्यान, वाघही विनाकारण कोणावर हल्ला करत नाहीत. त्यांना समोरच्या व्यक्तीकडून धोक्याची जाणीव झाली तरच ते माणसांवर हल्ला करतात असंही हा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणत आहेत. दरम्यान, वाघ रस्त्यावर आल्यामुळे त्याचा जंगलातील वाहतुकीवरही परिणाम झाला होता, मात्र काही वेळाने ही वाहतूक सुरळीत झाली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Social media viral video live footage of a bike rider in the jaws of a tiger blows your mind jap
Show comments