प्रवासादरम्यान किंवा फिरायला गेल्यावर एखादी वस्तू हरवली, तर ती परत मिळण्याची अपेक्षा फारच कमी असते. पण, सध्या सोशल मीडियाची ताकद इतकी वाढली आहे की, जणू काही संपूर्ण जग माणसांच्या मुठीत आलं आहे. तर सोशल मीडियावर अशीच एक पोस्ट व्हायरल होत आहे. ज्यात एका तरुणाचे एअरपॉड केरळमध्ये हरवतात. पण, सोशल मीडियाच्या एका पोस्टच्या मदतीने या तरुणाला त्याचे एअरपॉड अगदीच खास पद्धतीत परत मिळतात.

२१ डिसेंबरला निखिल या तरुणाने एक पोस्ट शेअर केली होती. त्यात त्याने सांगितले की, त्याचे केरळमध्ये एअरपॉड हरवले आहेत. तसेच एक व्यक्ती एअरपॉड घेऊन दक्षिण गोव्यात दोन दिवस प्रवास करीत आहे; हे त्याला लोकेशन ट्रॅकिंग फिचर वापरता समजले. त्यानंतर त्याने लोकेशन ट्रॅकिंगचा एक स्क्रीनशॉट एक्स (ट्विटर) वर शेअर केला आणि ती व्यक्ती अंदाजे कुठे राहत असेल याचे वर्णन करत एक्स (ट्विटर) युजर्सकडे मदतीची विनंती केली.

77 lakh fraud by cyber thieves, lure of investment ,
पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांकडून ७७ लाखांची फसवणूक
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
navi mumbai cyber crime
यंदा नवी मुंबईत १ अब्ज ३७ कोटींहून अधिक रुपयांची सायबर लूट
Heart touching video of a kid crying and asking mother to come early from work emotional video viral on social media
रडत रडत तिच्याजवळ गेला अन्…, कामावर जाणाऱ्या आईला मुलाची विनवणी, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
iPhone News
iPhone : अँड्रॉईडऐवजी आयफोन असल्यास टॅक्सी APP बुकिंगचे दर वाढतात का? सोशल मीडियावर काय चर्चा?

हेही वाचा…डिजिटल वरात! बँजो, डीजे नाही तर ‘या’ कारणाने अनोखी ठरली लग्नाची वरात; पाहा VIDEO

पोस्ट नक्की बघा :

त्यानंतर काल ५ जानेवारी २०२४ रोजी त्याने पुन्हा एक पोस्ट शेअर करीत आनंदाची बातमी दिली आहे. तर संकेत या गोव्यात राहणाऱ्या एका अज्ञात तरुणाने निखिलची मदत केली. त्याने निखिलचे एअरपॉड शोधून काढले आणि मडगाव पोलिस शहर स्थानकाबाहेर एअरपॉडबरोबर एक फोटो काढून तुझे एअरपॉड मिळाले, असा निखिलला त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर संदेश पाठवला.

सोशल मीडियावर ही पोस्ट @niquotein याला एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. तसेच निखिलने पोस्ट शेअर करत लिहिले की, तुम्ही विश्वास ठेवू शकता का? देवदूत संकेत, गोवा पोलिस, केरळ पोलिस, एक्स (ट्विटर), ट्रॅकिंग फिचर आणि एक्स (ट्विट) ला उत्तर देणाऱ्या प्रत्येक युजरचे आभार! किती सुंदर गोष्ट आहे. जग खूप मोठे असले तरीही लहान आहे; अशी सुंदर कॅप्शन युजरने दिली आणि सर्वांचे आभार मानले. नेटकरी ही पोस्ट पाहून ‘या गोष्टीवर एक चित्रपट तयार होईल’, अशी कमेंट करत आहेत.

Story img Loader