सोशल नेटवर्किंगवर सतत कोणती ना कोणती गोष्ट चर्चेत असते. त्यातच करोना कालावधीमध्ये देश-विदेशातील प्रभावशाली व्यक्तींनी केलेल्या वक्तव्यांवरुन अनेक बातम्याही सध्याच्या काळात समोर येत आहेत. अर्थात यामध्ये सकारात्मक बातम्यांपेक्षा वादग्रस्त वक्तव्ये आणि कृतींसंदर्भातील बातम्याच जास्त असतात. मात्र मागील काही आठवड्यांपासून सोशल नेटवर्किंगवर जर्मनीच्या सर्वोच्च राजकीय पदावर असणाऱ्या जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल यांचा एका फोटो चांगलाच व्हायरल होतोय. विशेष म्हणजे एका सकारात्मक करणासाठी हा फोटो व्हायरल होत असून या फोटोत दोन व्यक्ती मर्केल यांच्या पुढे चालताना दिसत आहेत. हा फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत असून फोटोमधील कृतीसाठी मर्केल यांचं कौतुक होताना दिसत आहे.
नक्की वाचा >> केंद्र सरकारला मोठा धक्का… करोना संशोधन गटाच्या प्रमुखांचा राजीनामा; सरकारी धोरणांविषयी व्यक्त केलेली नाराजी
हाफिंग्टन पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार मर्केल यांच्या या फोटोमध्ये त्यांच्या पुढे चालणाऱ्या दोन्ही व्यक्ती या शास्त्रज्ञ आहेत. फायझर-बायोएनटेकच्या लसीच्या निर्मितीमध्ये अर्धा वाटा असणाऱ्या बायोएनटेक कंपनीचे सर्वेसर्वा असणारं हे जोडपं आहे. या फोटोत दिसणाऱ्या आणि मर्केल यांच्या पुढे चालणाऱ्या व्यक्ती आहेत, डॉ. उजूर साहान (Uğur Şahin )आणि त्यांची पत्नी ओझल तुरेशी (Özlem Türeci) मर्केल. जर्मनीचे राष्ट्रपती फ्रँक वॉल्टर स्टेनमीयर यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनामध्ये म्हणजेच बेलव्यू पॅलेसमध्ये मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात करोना विरुद्धच्या लढ्यामध्ये फायझरची लस शोधण्यात मोलाचं योगदान देणाऱ्या या जोडप्याचा ‘ग्रॅण्ड क्रॉस ऑफ मेरीट विथ स्टार’ हा जर्मनीमधील सर्वोच्च पुरस्कार प्रदान करुन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या काही क्षण आधी हा फोटो काढण्यात आलाय.
नक्की वाचा >> “रडत राहणं काहींच्या स्वभावामध्येच असतं, मात्र माझा रडण्यावर विश्वास नाही आणि…”; मोदींचा जुना व्हिडीओ व्हायरल
या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेल्या बेलव्यू पॅलेसमधील हॉलमध्ये जेव्हा मान्यवरांनी प्रवेश केला तेव्हा सर्वात पुढे साहान आणि ओझल सर्वात पुढे चालत होते. या दोन वैज्ञानिकांच्या मागून देशाच्या चॅन्सलर आणि राष्ट्रपतींनी हॉलमध्ये प्रवेश केला. राष्ट्रपती आणि मर्केल यांच्या या कृतीमधून दोन्ही राजकारण्यांनी वैज्ञानिकांबद्दल त्यांना किती मान आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा सोशल नेटवर्किंगवर आहे. देशातील दोन्ही सर्वोच्च राजकीय व्यक्तींनी करोना संकटाच्या काळामध्ये देशासाठी आणि लसीसाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान आपल्या कृतीतून केल्याची चर्चा सोशल नेटवर्किंगवर रंगली.
नक्की वाचा >> “सर्व चांगल्या गोष्टींचं श्रेय स्वत: घ्यायचं अन् वाईटासाठी राज्य सरकारांना दोषी ठरवायचं, अशी मोदींची वृत्ती”
ट्विटरवरील एका व्हायरल ट्विटनुसार मर्केल यांनीच हॉलमध्ये या वैज्ञानिकांच्या आधी प्रवेश घेण्यास नकार दिला. “बुद्धीमान व्यक्तींनी देशाचं नेतृत्व केलं पाहिजे,” असं म्हणत मर्केल यांनी पुरस्कार विजेत्या वैज्ञानिकांना आधी हॉलमध्ये प्रवेश करण्यास सांगितल्याचा दावा केला जातोय. मात्र प्रसारमाध्यमांसमोर मर्केल त्या दिवशी काहीच बोलल्या नाहीत. तसेच त्यांनी असं कोणतही वक्तव्य सार्वजनिक रित्या केलं नाही.
German Chancellor Angela Merkel refused to walk next to scientists, Dr. Igor Shaheen and his wife Ozlem Tureci who had developed the Covid 19 vaccine. She instead walked after them and said, “Scholars should lead nations, sirs.” pic.twitter.com/5qWo1xC6iA
— Naya Daur Media (@nayadaurpk) March 24, 2021
मात्र या पुरस्कार सोहळ्यात मर्केल यांनीच काहीच प्रतिक्रिया दिली नसली तरी त्यांनी डिसेंबर महिन्यामध्ये या दोन्ही संशोधकांचा उल्लेख करताना, “आमच्या देशामध्ये असे संशोधक असल्याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो,” असं म्हटलं होतं.
नक्की वाचा >> भारताच्या करोनामुक्तीचा प्लॅन आहे तयार: ३६ लाख कोटींच्या गुंतवणुकीला परवानगी द्या; मोदींच्या नावाने जाहिरात
नक्की वाचा >> कौतुकास्पद! विराट, अनुष्काने वाचवले चिमुकल्याचे प्राण; जगातील सर्वात महागड्या औषधाची होती गरज
या पुरस्कार सोहळ्यामध्ये राष्ट्रपतींनी दिलेल्या भाषणामध्ये, भविष्यामध्ये या दोन्ही संशोधकांकडून अधिक चांगलं आणि यापूर्वी कधीही न झालेल्या विषयांबद्दल संशोध होऊन त्याचा सर्वांना फायदा मिळो अशी इच्छा व्यक्त केली. जगभरातील अनेक ठिकाणी तुम्ही लस सोधण्यासाठी केलेल प्रयत्न आणि त्यातून मिळालेला परिणाम हा चमत्कार असल्याचं मानलं जातं. तुम्ही दोघे एक प्रतिभावान जोडपं तर आहातच शिवाय उत्तम संशोधक, विचारवंत आणि अगदी जगाचे तारणाहार म्हणून ओळखले जात आहात, अशा शब्दांमध्ये या दोघांचा गौरव राष्ट्रपतींनी केला.