Soda seller offered a job for fresher: सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललीय. त्यात मजेशीर व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. कन्टेन्टसाठी नवनवीन कल्पना सुचवून व्हिडीओ शेअर करीत आजकाल लोक प्रसिद्ध झाले आहेत.

परंतु, तुम्ही कधी सोडा शॉपवर जॉबच्या व्हॅकन्सीचा व्हिडीओ पाहिलाय का, ज्याचं वार्षिक उत्पन्न तब्बल सहा लाख असेल. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात सोडा विक्रेता फ्रेशर्ससाठी जॉब देऊ करतोय आणि याच जॉबसाठी तो वार्षिक सहा लाखांचं उत्पन्न (पॅकेज) देऊ करतोय.

हेही वाचा… ‘बन ठन चली’, परदेशी डान्सर रिकी पॉंडचा भारतात जलवा, गेट वे ऑफ इंडियासमोर बॉलीवूड गाण्यावर धरला ठेका

व्हायरल व्हिडीओ

व्हिडीओची सुरुवात होताच एक माणूस सोडा विक्रेत्याला तुम्ही दिवसाला किती पैसे कमवता, असा प्रश्न करतो. त्यावर तो सोडा विक्रेता म्हणाला, “माझी दिवसाची कमाई सोडा तुम्ही. तुम्हाला जॉब हवाय का, असं विचारून सोडा विक्रेता जॉब ओपनिंगची जाहिरातच करू लागतो. कोणालाही जॉब हवा असेल, तर तुम्ही अप्लाय करू शकता. फ्रेशरपण अप्लाय करू शकतात आमच्या सोडा शॉपवर, या राजस्थानी सोडा टिपू चौकवर.”

वर्षाला सहा लाख रुपये सीटीसी नाही, तर तुम्हाला ‘इन हॅण्ड’ मिळणार. कोणीही अप्लाय करू शकता. फ्रेशर्ससाठी खास संधी. तुम्ही फक्त या इकडे, आम्ही देऊ जॉब. आम्हाला हेल्परची गरज आहे.

@nsworld06 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. तथापि, असे मानले जातेय की, नोकरीची रिक्त जागा आणि व्हिडीओमध्ये केलेले दावे खरे नाहीत. कॉन्टेन्ट क्रिएटरने केवळ गंमत आणि करमणुकीच्या हेतूने हा व्हिडीओ तयार केला होता.

हेही वाचा… तरुणाच्या कलाकारीला तोड नाही! अवघ्या सेकंदांत १६ ठिपक्यांपासून साकारले गणपती बाप्पाचे सुरेख चित्र

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ व्हायरल होताच युजर्सने त्यावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिलं, हे तर infosys पेक्षा जास्त पैसे देतायत. तर, दुसऱ्याने कमेंट करीत लिहिलं, “भावा, स्टॉलवर काम करायचा तीन वर्षांचा अनुभव आहे मला. काही जास्त पैसे मिळतील का?” अनेकांनी या जॉबसाठी अप्लाय कसं करायचं याबद्दल विचारणा करणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत.

हेही वाचा… “सूनबाईचे ३,००० रुपये आले”, ‘लाडकी बहीण’चे पैसे आल्यावर सासू-सुनेने केला जबरदस्त डान्स; VIDEO VIRAL

दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच या व्हिडीओला तब्बल ९.७ मिलियन व्ह्युज आले आहेत.