भारत हा कृषीप्रधान देश आहे. पण असे असले तरी करिअर म्हणून या क्षेत्राकडे फार कमीच तरुण वळतात. पण गोव्यात राहणा-या अजय नाईक या तरुणाने हाइड्रोपोनिक शेती करण्यासाठी आपली सॉफ्टवेअर कंपनी विकली आहे. अजयने एक नवा आदर्श तरुणांपुढे ठेवला आहे.
वाचा : भारतीय वंशाच्या उद्योजकाने बनवल्या पाण्यात विरघळणा-या प्लास्टिक पिशव्या
गोव्यात राहणारा ३२ वर्षाचा सॉफ्टवेअर इंजिनिअर अजय नाईक यांची स्वत:ची सॉफ्टवेअर कंपनी होती. पण इंजिनिअर म्हणून आपले करिअर घडवण्यापेक्षा त्याने एक प्रगतीशील शेतकरी होण्यास प्राधान्य दिले. रसायने फवारलेली फळ आणि भाज्या खाण्यापेक्षा लोकांना आरोग्यदायी भाज्या खायला मिळाव्यात यासाठी त्याने हाइड्रोपोनिक शेती करण्याचे ठरवले. ‘द बेटर इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत हे गोव्यातील पहिले हाइड्रोपोनिक शेत असल्याचे त्याने सांगितले. सहा जणांच्या मदतीने अजय ऑर्गेनिक भाज्या आणि फळे पिकवतो. पाण्याचा पुरेपुर वापर आणि कोणत्याही हानिकारक रसायनांचा वापर न करता अजय आपल्या शेतामध्ये भाजीपाला पिकवतो. अनेक सुपरमार्केटमध्ये त्यांच्या उत्पादनाला मोठी मागणी आहे. यावर्षी त्याने आपली कंपनी विकली होती. यातून मिळालेल्या पैशातून त्याने छोटे हाइड्रोपोनिक फार्म उभारले.
वाचा : सोन्याच्या दुकानात उभ्या गरीबाची आधी थट्टा, नंतर मिळाल्या लाखोच्या भेटवस्तू