Viral Video: सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला जवळपास ९०० वर्षांची परंपरा आहे. जानेवारी महिन्यात ही यात्रा आयोजित केली जाते. या दिवसात सोलापूरकर सिद्धरामेश्वरच्या दर्शनासाठी येत असतात. कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांमधूनही भाविक सोलापुरात येत असतात. दोन वर्ष करोनाच्या सावटानंतर आता यावर्षी यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. यंदा सोलपुराचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज मंदिरात यात्रेच्या दरम्यान एक अत्यंत दुर्मिळ व खास दृश्य पाहायला मिळाले.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, सिद्धरामेश्वर महाराज मंदिराच्या यात्रेदरम्यान आकाशात सर्प दृश्य पाहायला मिळाले. पक्षांच्या थव्याने हे मंदिर परिसरात नागोबाच्या फण्यासारखा आकार घडवून आणला होता. हे नयनरम्य दृश्य पाहून भाविकही आनंदून गेले होते.
Video: आकाशात दिसले नागोबा
हे ही वाचा<< ‘हा’ आहे जगातील दुसरा सर्वाधिक तस्करी होणारा प्राणी; तुम्हाला नाव व खासियत माहितेय का?
दरम्यान या व्हिडिओवर लाखो व्ह्यूज आहेत तर ३ लाखाहून अधिक यूजर्सनी हा व्हिडीओ लाईक केला आहे. एका युजरने सांगितल्याप्रमाणे हे पक्षी स्टर्लिंग या नावाने ओळखले जातात. हे पक्षी असे थवा करून विविध आकार साकारतात. अनेकांनी या व्हिडिओवर निसर्गाची किमया म्हणत कमेंट केली आहे.