केंद्र सरकारच्या वतीने नागरिकांना सौरऊर्जेसाठीची पॅनेल मोफत वाटण्यात येत असल्याची ‘पोस्ट’ सध्या व्हॉटस्अॅपवर फिरत आहे. त्यासाठी एक नोंदणी अर्ज भरण्याची सूचना करण्यात आली आहे. यात नाव, राज्य आणि गावचे नाव नमूद करण्यास सांगण्यात आले आहे. मात्र ही सारी प्रक्रिया पार पाडल्यानंतर व्हॉटस्अॅपवरील दहा मित्रांना सौर पॅनेलविषयीची ‘पोस्ट’ शेअर करण्याविषयी सांगण्यात आले आहे. अर्थात हा सारा पुन्हा बनवाबनवीचाच प्रकार असल्याचे उघड झाले आहे. सरकारच्या वतीने सौर पॅनेलविषयी कोणतीही योजना मोफत देण्यात आलेली नाही. उलट इंटरनेटचा दुरुपयोग करणाऱ्या काही व्यक्तींनी समाजमाध्यमांच्या साहाय्याने व्यक्तिगत माहिती चोरण्यासाठी हा सापळा रचलेला आहे. यातून दूरध्वनी क्रमांक, नाव आणि इतर माहिती चोरली जाते. याचशिवाय ही पोस्ट अन्य दहा मित्रांना पाठविल्यास त्यांचीही माहिती गोळा करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मध्यंतरी ‘अदिदास’ या क्रीडा उत्पादन कंपनीच्या वतीने मोफत बूट वाटप केले जात असल्याची ‘पोस्ट’ व्हॉटस्अॅपवर फिरत होती. परंतु तोही असाच एक प्रकार होता.
फेकन्युज : ‘सौरऊर्जे’ची बनवाबनवी!
केंद्र सरकारच्या वतीने नागरिकांना सौरऊर्जेसाठीची पॅनेल मोफत वाटण्यात येत असल्याची ‘पोस्ट’ सध्या व्हॉटस्अॅपवर फिरत आहे.
Written by लोकसत्ता टीम
आणखी वाचा
First published on: 05-05-2018 at 00:28 IST
मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Solar energy