कोडं किंवा कोडी सोडवणे हा खेळाचा प्रकार आहे ज्यामध्ये व्यक्तीची कल्पनाशक्ती आणि त्याचे ज्ञान तपासले जाते. कोडं म्हणजे एक असा प्रश्न असतो त्या प्रश्नातचं त्याचं उत्तर दडलेलं असतं. जो व्यक्ती कोड्याचा योग्य अर्थ लावून त्याचं उत्तर शोधू शकतो त्याला अत्यंत बुद्धिमान मानले जाते. दिलेल्या कोड्यामध्ये समोरील व्यक्तीला चारही बाजूंचा विचार करून कोडे सोडवायला लागते. कोड्यांचे विविध प्रकार आहेत, जसे की क्रॉसवर्ड कोडी, शब्द-शोध कोडी, नंबर कोडी, रिलेशनल कोडे किंवा तर्कशास्त्र कोडे.
अनेकदा वडीलधारी मंडली लहान मुलांना अशी कोडी सोडवण्यासाठी देतात ज्यामुळे त्यांची बौद्धिक क्षमतेमध्ये सुधारणा होईल. बालपणी तुम्हालाही तुमच्या आजी-आजोबा, आई-बाबा किंवा काका-काकूंनी अशी कोडी सांगितली असतील जी सोडवाताना तुम्हाला नक्कीच मज्जा आली असेल. तुम्हाला मजेशीर कोडं सोडवायला फार आवडतं का? या प्रश्नाचं उत्तर होय असेल तर हा व्हायरल व्हिडीओ नक्की बघा. व्हिडीओमध्ये एका आजीबाईंनी एक कोडं घातलं आहे आणि त्याचा उत्तर शोधण्याचां प्रयत्न करा.
हेही वाचा – रस्त्यावर साचलेल्या पाण्यात भटक्या कुत्र्यांसह खेळतोय चिमुकला, Viral Video पाहून चेहऱ्यावर येईल हसू
व्हायरल व्हिडीओमध्ये आजी म्हणते, पोरांनो, माझं कोडं ओळखा, – “अंधाऱ्या कोठडीत म्हातारी मेली, पाच जण भाऊ, दोघांनी नेली”
तुम्हाला आजीचं कोड्याचा उत्तर समजलं का? जरा डोकं चालवा अन् कोडं सोडवा.
हेही वाचा – रस्त्यावर साचलेल्या पाण्यात भटक्या कुत्र्यांसह खेळतोय चिमुकला, Viral Video पाहून चेहऱ्यावर येईल हसू
आजीबाईंनी दिलेलं कोड सोडवण्याचा अनेक नेटकऱ्यांनी प्रयत्न केला आहे. अनेकांनी कमेंट करून कोड्याचं उत्तर सांगितलं आहे. एकाने कमेंटमध्ये उत्तर सांगितले की, “शेंबूड ५ बोट असून २ बोटांनी काढतो ना”
दुसरा म्हणाला, “केसांमधील ऊ”
तिसरा म्हणाला, ” कंदिल
चौथा म्हणाला, “मेकुड”
आणखी एकाने उत्तर दिले,” कान”
वरीलपैकी तुम्हाला कोणते उत्तर योग्य वाटते?