२०२४ संपले आणि २०२५ हे नवीन वर्ष सुरु आहे. मागे वळून पाहताना २०२४ वर्षात अनेक लक्षवेधक घटना घडल्याचे लक्षात येते दरम्यान यापैकी काही घटना अशा आहेत ज्या २०२४मध्ये घडतील याबाबत आधीच भविष्यवाणी करण्यात आली होती. जगभरात असे लाखो लोक आहेत, जे भविष्य माहीत असल्याचा दावा करतात. पण, ज्यांची भाकिते इतरांपेक्षा जास्त प्रमाणात खरी ठरतात त्यांनाच जगभरात ओळखले जाते. नेत्रहीन बल्गेरियन महिला वांगेलिया पांडेवा गुश्तेरोवा ऊर्फ बाबा वेंगा यांनी २०२४ मधील अनेक महत्त्वाच्या घटनांचे भाकीत मांडले होते त्यापैकी, पाच अंदाज खरे ठरले आहेत असे म्हटले जाते.
१) जागतिक आर्थिक संघर्ष (Global Economic Struggles)
बाबा वेंगा यांनी २०२४ मध्ये आर्थिक संकटाचे भाकीत केले आणि २०२४ मध्ये तसेच घडले. वाढत्या किमती, कर्मचारी कपात आणि उच्च-व्याजदरांमुळे लाखो लोकांसाठी आर्थिक ताण निर्माण झाला. अमेरिकेने अधिकृत मंदी टाळली असली तरी जागतिक बाजारपेठांना अस्थिरतेचा सामना करावा लागला. वेगा यांची भविष्यवाणी अनिश्चित काळात अर्थव्यवस्था किती नाजूक असू शकते याची आठवण करून देते.
२) हवामान संकट तीव्र होत आहे (Climate Crisis Intensifies)
बाबा वेंगा यांनी भाकीत केल्याप्रमाणे,२०२४ मध्ये हवामानाचे संकट वाढतच गेले. जागतिक तापमान पूर्व-औद्योगिक पातळीपेक्षा १.५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढल्याने हे वर्ष रेकॉर्डवरील सर्वात उष्ण वर्ष ठरले. गंभीर दुष्काळ आणि प्रचंड पूर यांसह हवामानाच्या घटना अत्यंत सामान्य होत्या. COP29 हवामान परिषदेतील जागतिक नेत्यांना शास्त्रज्ञांनी अपरिवर्तनीय नुकसानीचा इशारा दिल्याने कठोर कारवाई करण्याचे आवाहन करण्यात आले.
हेही वाचा –Baba Vanga Predictions 2025 : २०२५मध्ये जगावर भूकंपाचे संकट, भारतावर प्रभाव होणार? बाबा वेगाचं काळजाचं थरकाप उडवणार भाकीत
३) प्रमुख वैद्यकीय प्रगती (Major Medical Breakthrough)
बाबा वेंगाच्या सर्वच भविष्यवाण्या भयंकर होत्या असे नाही. २०२४ मध्ये गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगाच्या उपचारातील प्रगतीमुळे औषधातील प्रगतीचा तिचा अंदाज खरा ठरला. संशोधकांना आढळले की, “मानक उपचारांपूर्वी केमोथेरपी दिल्याने मृत्यूचा धोका ४०% कमी होतो. या शोधाने लाखो लोकांना आशा दिली आणि कर्करोग संशोधनात एक मोठे पाऊल पुढे टाकले.
४) युरोपमध्ये वाढता तणाव ( Rising Tensions in Europe)
बाबा वेंगाच्या चेतावणीनुसार २०२४ मध्ये युरोपमधील संघर्षाची चिन्हे दिसायला सुरुवात झाली. पूर्ण प्रमाणात युद्ध सुरू झाले नसले तरी वाढता तणाव, सीमा विवाद आणि राजकीय विभागणी यामुळे या प्रदेशात अधिक अस्थिरता निर्माण झाली. भविष्यात काय घडू शकते, याबद्दलच्या अंदाजाने अनेकांना चिंता वाटत आहे.
५) तंत्रज्ञानात मोठी झेप (Big Leap in Technology)
बाबा वेंगा यांनी भाकीत केले होते की, २०२४ मध्ये तंत्रज्ञानामध्ये, विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मध्ये मोठी प्रगती होईल. या वर्षी AI आणखी शक्तिशाली होईल. वैद्यकीय निदान, कायदेशीर संशोधन आणि सर्जनशील प्रकल्प यांसारख्या कामांमध्ये AI मदत करत आहे. या प्रगतीमुळे जीवनात सुधारणा होत असतानाच, त्यांनी समाजातील यंत्रांच्या भूमिकेबद्दलही प्रश्न उपस्थित केले.
२०२४ मधील बाबा वेंगाची भविष्यवाणी अत्यंत अचूक होती, ज्यामुळे अनेकांना भविष्याबद्दल त्यांनी केलेल्या इशाऱ्यांबद्दल आश्चर्य वाटू लागले. २०२४ मध्ये “महान युद्ध” आणि युरोपच्या लोकसंख्येमध्ये मोठी घट होण्याची भविष्यवाणी वेंगा यांनी केली होती. हे दृष्टांत खरे ठरतील की नाही हे पाहणे बाकी आहे, परंतु वेंगाच्या अंदाजांमुळे जगभरात उत्सुकता आणि चर्चा सुरूच राहणार आहे.