गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. आजकाल चोरीची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. कधी कुठे कशा प्रकारे चोरी होईल, याचा कोणीही अंदाज बांधू शकत नाही. दिवसेंदिवस अशी प्रकरणे वाढत चालली आहेत. सोशल मीडियावरही याचे व्हिडीओ व्हायरल झालेले पाहायला मिळतात. चोर वेगवेगळ्या ट्रिक्स वापरून चोरीच्या संधी शोधून काढतात. असाच एक व्हिडीओ समोर आलाय; ज्यामध्ये चोर चोरी करून पळून जाण्याच्या प्रयत्नात असतो; मात्र अचानक त्यांच्याबरोबर असे काही घडते की, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, पाहा नेमके काय घडले?
तुम्ही कधी चोराचा प्लॅन फसल्याचे आणि तोच अडचणीत आल्याचे पाहिले आहे का? आज आम्ही तुम्हाला असाच एक व्हिडीओ दाखविणार आहोत; जो पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. तुम्ही आतापर्यंत चोरीशी संबंधित अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहिले असेल. मात्र, ट्विटर या सोशल प्लॅटफॉर्मवर सध्या चोरीचा जो व्हिडीओ दिसत आहे, तो पाहून तुम्हालाही हसू येईल. यात घडले असे की….
(हे ही वाचा : पाकिस्तानी विद्यार्थ्याची फिजिक्सची उत्तरपत्रिका वाचून थांबणार नाही हसू; उत्तर वाचून शिक्षकही… )
दुचाकी चोरताना पकडले
@gharkekalesh ने मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे Twitter) वर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये काही लोकांनी दोघांना पकडून मारहाण केल्याचे दिसतेय. व्हिडीओसोबतच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे, “ज्यांच्या बहिणीचे लग्न होते, त्यांची बाईक चोर चोरत होते, त्यांना मारहाण करण्यात आली.” दोघेही चोरीच्या उद्देशाने लग्नाला गेले होते; पण चोरी करताना लोकांनी त्यांना पकडले हे वाचल्यावर स्पष्ट होते. त्यानंतर लोकांनी चोरट्यांना बेदम मारहाण केली. व्हिडीओमध्ये चोरांना मारहाण केली जात असताना स्पष्ट दिसत आहे.
व्हायरल व्हिडीओ येथे पहा
वृत्त लिहेपर्यंत सात हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक कमेंट सेक्शनमध्ये कमेंट्स करताना खूप मजा घेत आहेत. एका युजरने लिहिले, “भाऊ हळू मारा.” आणखी एका युजरने लिहिले, “स्लिपरने मारणे ही सर्वोत्तम मारहाण आहे.” तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “चप्पल अधिक मजबूत असायला हवी होती.” एका युजरने लिहिले, “लग्नातही चोरी.”, अशाप्रकारच्या प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत.