Indian Railway Viral Video: सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. विचित्र, मजेशीर, हटके, धोकादायक, आश्चर्यकारक अशा गोष्टी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात. सोशल मीडियावर कधी कधी असे काही व्हिडीओ समोर येत असतात; ज्यावर विश्वास ठेवणंदेखील कठीण होतं. आता असाच एक व्हिडीओ समोर आला आहे; ज्यावर विश्वास ठेवणं तुम्हालादेखील कठीण वाटेल.
भारतीय रेल्वेनं रोज लाखो प्रवासी प्रवास करतात. सर्वांत सुरक्षित प्रवास रेल्वेचा म्हटला जातो. सोशल मीडियावर अनेक रेल्वेसंदर्भातील व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता असाच एक रेल्वेचा विचित्र व्हिडीओ समोर आला आहे; जे पाहून तुम्हालाही धक्काच बसेल. खरं तर या व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये रेल्वे कर्मचारी रेल्वेचा डबा ढकलताना दिसत आहेत. हा ट्रेनचा डबा अधिकाऱ्यांचा असल्याचे सांगण्यात येत आहे; ज्यामधून ते तपासणीसाठी जातात. याबाबत तपासणी करणाऱ्या वाहनामध्येच बिघाड झाल्याचे सांगण्यात येत आहे.
(हे ही वाचा:एका मिनिटात झटपट चार पोळ्या होतील तयार; महिलेचा भन्नाट जुगाड पाहा; Video पाहून तुम्हीही म्हणाल वाह्ह हुश्शार!)
नेमकं काय घडलं?
हे संपूर्ण प्रकरण उत्तर प्रदेशातील अमेठीच्या निहालगढ रेल्वेस्थानकाचं आहे. अधिकारी सुलतानपूरकडून डीपीसी ट्रेननं लखनौच्या दिशेने जात होते, त्यावेळी ट्रेनमध्ये अचानक बिघाड झाला. वास्तविक, रेल्वे अधिकाऱ्यांसाठी बांधलेली डीपीसी ट्रेन रुळांच्या मधोमध तुटली होती. त्यामुळे ट्रेन स्थानकाच्या बाहेरच थांबली. डीपीसी ट्रेनमध्ये बिघाड झाला तेव्हा ती मेन लाइनवर उभी होती, असे सांगण्यात आले. ही गाडी मेन लाइनवर उभी असल्यानं इतर गाड्यांच्या मार्गामध्ये तिच्यामुळे अडथळा होऊ नये म्हणून रेल्वे कर्मचाऱ्यांनी ट्रेन मेन लाइनवरून लूप लाइनवर ढकलली. कर्मचारी रेल्वेला ढकलत असल्याची घटना कोणीतरी आपल्या कॅमेऱ्यात कैद करून घेतली. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामुळे रेल्वे विभागाची बदनामी होत आहे.
व्हिडीओ पाहा
समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये काही लोक रेल्वे फाटकावरून ट्रेन ढकलून पुढे नेत असल्याचे दिसत आहे. आता ही गाडी दुरुस्तीसाठी पुढे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. कोणीतरी या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड केला; जो आता व्हायरल होत आहे. लोकांनी यावर आपल्या मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.