सोशल मिडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. रोज काहीना काही व्हायरल होत असतच यात अनेक गोष्टी मज्जेशीर असतात तर काही महत्त्वाच्या. असचं एक ट्वीट सोशल मिडियावर व्हायरल झालं आहे. नोकरी साठी मिळवण्यासाठी मुलाखती दरम्यान आपण आपला सी.व्ही घेऊन जातो. त्या सी..व्ही. मध्ये आपले फक्त शिक्षणाचे तपशील द्यायचे नसतात तर अन्य गोष्टीही लिहायच्या असतात. सी.व्ही. मधला महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्याकडे असलेल्या स्कील बद्दल अर्थात कौशल्याबद्दल माहिती देणे. असचं एकाने त्यांच्या सी.व्ही. मध्ये स्किल्सच्या रखाण्यात ‘googling’ म्हणजे ‘गुगल वर सर्च करता येत’ असं लिहल होत. आणि याचमुळे या संदर्भातील ट्वीट व्हायरल झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काय होत ट्वीट?

ट्वीटरवरील यूजर कॅट मॅक जी यांनी नुकतच एक ट्वीट करून त्यांच्याकडे मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवाराच्या सी.व्ही. बद्दल माहिती दिली. त्या लिहतात “आज सी.व्ही. मिळाला आणि त्या व्यक्तीने त्याच्यातील एक कौशल्य म्हणून अक्षरशः ‘googling’ असं सूचीबद्ध केलं आहे.”  पुढे त्याच पोस्ट मध्ये त्या लिहतात “आम्ही त्याची मुलाखत घेत आहोत.”

कमेंट्सचा पाऊस

२३ जुलै रोजी शेअर केलेल्या या ट्वीटवर आतापर्यंत २ हजाराहून जास्त लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. तर १८४ हजाराहून जास्त लोकांनी या ट्वीटला लाईक केलं आहे आणि १३ हजाराहून जास्त युजर्सने री- ट्वीट केले आहे. एक युजर कमेंट करतो, “तुम्हाला आश्चर्य वाटायलाच हवे कारण कितीतरी लोक गुगल व्यवस्थित करू शकत नाहीत. मी गुगलच्या तांत्रिक वापराबद्दल बोलत नाही. मी योग्य कीवर्ड लिहिण्याविषयी बोलत आहे, काही लोक वगळता विविध वाक्याची चाचणी करण्याचा प्रयत्न करीत असतात.” तर दुसरा युजर म्हणतो, “ माझा रेझ्युमे म्हणतो की मी त्रास देऊ शकतो. खरतर तसं नाही पण मला फक्त हेच जाणून घ्यायचे आहे की माझा मुलाखतकर्ता ते किती बारकाईने वाचत आहे.”

मॅक जी यांची कमेंट

त्यांच्या पहिल्या ट्वीट नंतर आणि मुलाखत संपल्यावर कॅट मॅक जी यांनी एक कमेंट केली. त्या ट्वीटमध्ये त्या म्हणतात कि, “ एकूणच उमेदवाराचा उत्तम सीव्ही होता. जर त्याने प्रतिसाद दिला तर होय! पण फक्त गुगल करण्याच्या स्कील मुळे नाही तर त्याचा सी.व्ही. उत्तम होता म्हणून”

या ट्विटबद्दल तुमचे काय मत आहे?