सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल आणि पहायला मिळेल याचा काहीच नेम नाही. सध्या सोशल मीडियावर एक पर्सचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. आता तुम्ही म्हणाल यात विशेष काय आहे. विशेष हे आहे की, हे पर्स माणसाच्या तोंडासारखी आहे. ही अजब गजब पर्स सध्या नेटीझन्ससाठी चर्चेचा विषय ठरत आहे.
या अजब गजब पर्सचा व्हिडीओ जपानमधील डिजेनं डिजाइन केला आहे. त्यानं ड्यू नावाच्या आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. छोट्याशा व्हिडीओमध्ये दिसत असलेला पर्स खूपच अजब गजब आहे. ही पर्स सिलिकॉन रबरने तयार केली आहे. त्याचं डिजाइन हुबेहुब एखाद्या व्यक्तीच्या तोंडासारखंच आहे. पर्समध्ये नाणी ठेवण्यासाठी ओठ उघडावे लागतात. विशेष म्हणजे पर्सवरील व्यक्तीचा चेहरा हुबेहुब दिसावा म्हणून पर्सच्या आतमध्ये दातही लावण्यात आले आहेत.
माणसाच्या मांसापासून ही पर्स तयार केल्यासारखं त्या पर्सकडे पाहिल्यानंतर वाटते. या पर्सवर सोशल मीडियावर समिश्र प्रतिक्रिया येत आहेत.
एका नेटीझन्सनं याला कूल म्हटलेय तर अन्य एकानं घाबरवणारं असल्याचे सांगितलं आहे.