“ससा तो ससा की कापूस जसा, त्याने कासवाशी पैज लाविली” हे ओळ वाचून तुम्हाला बालपणी ऐकलेली ससा कासवाच्या शर्यतीची गोष्ट आठवली असेल हो ना…बालपणी ऐकलेल्या गोष्टींपैकी सर्वांची आवडती गोष्ट आजही आपल्याला तोंडपाठ आहे. टुनटून उड्या मारणारा ससा आणि हळू हळू चालणारे कासव यांच्यांतील ही गंमतीदार शर्यत प्रत्यक्षात पाहण्याची मज्जा किती येईल ना? मग आता तुम्ही ही मज्जा अनुभवू शकता कारण प्रत्यक्षात काही लोकांनी ससा आणि कासवाची शर्यत लावली आहे आणि या शर्यतीचा निकाल ऐकून तुम्हाला खरंच धक्का बसेल. सोशल मीडियावर सध्या ससा आणि कासवाच्या शर्यतीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ससा कासवाची प्रत्यक्षात रंगली शर्यत

गोष्टीतील शर्यतीमध्ये कासव हळू हळू चालत असूनही टुनटून उड्या मारणाऱ्या सशाला कसे हरवते हे आपण अनेकदा ऐकले असेल पण प्रत्यक्षात असे घडले असे यावर आपल्यापैकी अनेकांनी विश्वास ठेवला नाही. ससा टुनटून उड्या मारत शर्यत सहज जिंकू शकतो असे असे अनेकांना वाटत असेल. पण ससा कासवाची गोष्टच खरी होती हेच हा व्हिडिओ सिद्ध करत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की, प्रत्यक्षात एका ससा आणि कासवाची शर्यत काही लोकांनी लावली आहे. शर्यती सुरु करण्याच्या रेषेजवळ ससा आणि कासवाचे पालक त्यांना घेऊन उभे आहेत. शर्यत सुरु होताच त्यांना त्यांना जमिनीवर ठेवतात पुढे जे घडतं ते पाहून तुम्हाला खरंच विश्वास बसणार नाही. शर्यत सुरु झाल्यानंतर कासव आपले हळू हळू त्याच्या वेगाने पुढे जात आहे पण ससा मात्र इकडे तिकडे बघत रमत रमत उड्या मारताना दिसतो. एकीकडे कासव सश्याला मागे टाकून शर्यंत जिंकते तर दुसरीकडे गोंधळलेल ससा उलट्या दिशेने उड्या मारत जातो. कासव शर्यत जिंकल्यानंतर सर्वजण टाळ्या वाजवतात. ससा आणि कासवाची गोष्ट आज खरी ठरली हे पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.

हेही वाचा – Viral Video : धक्कादायक! एकटी महिला पाहून मद्यपीचा कारमध्ये घुसण्याचा प्रयत्न, काचेवर मारत होता बुक्क्या

येथे पाहा व्हिडीओ

हेही वाचा –Video : चूक कोणाची? कामाचे तास संपल्याने पायटलचा टेक ऑफसाठी नकार! पुणे-बंगळुरू इंडिगो फ्लाइला ५ तास उशीर; प्रवाशांचे हाल

इंस्टाग्रामवर shshubham7 नावाच्या पेजवर ही स्टोरी शेअर केली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर अनेक कमेंट केल्या आहेत.

एकाने लिहिले की, “जर ससा जिंकला असता, तर आमच्या संपूर्ण शाळेच्या अभ्यासक्रमाला पुन्हा बदलावा लागला असता., तर दुसऱ्याने लिहिले की, “आता मला कासवाच्या कथेवर विश्वास आहे – ससा हरला.”

हेही वाचा – पुण्यात टोळक्यांचा थरार! आयटी इंजिनिअरच्या कुटुंबावर ४० जणांचा हल्ला; रात्रीच्या काळोखात रॉड, दगड अन् काठ्या घेऊन पाठलाग

वापरकर्त्यांपैकी एक म्हणाला, “कासवाला माहीत आहे की पुढे कसे चालायचे; सशाला हे काहीच कळत नाही की तो अजूनही धावत आहे.”

ससा कासवाच्या शर्यतीची दंतकथा असो किंवा व्हायरल व्हिडीओ दोन्हीमधून बोध हाच मिळतो की, तुम्ही कासवाप्रमाणे तुमच्या ध्येयाकडे लक्ष ठेवून वाटचाल करा मग तुमचा वेग कितीही हळू असू दे तुम्हा हार मानू नका आणि सश्याप्रमाणे आपल्या वेगावर गर्व करू नका आणि ध्येयापासून भरकटू नका अन्यथा तुमच्याकडे कितीही वेग असला तरी तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहचू शकणार नाही.