सोशल मीडियावर रोज कित्येक जुगाड व्हायरल होत असतात. प्रत्येक जुगाड एकापेक्षा एक असतो. सध्या सोशल मीडियावर असा जुगा व्हायरल होत आहे जो पाहून तुम्हाला धक्का बसेल. गॅस सिंलडेर ही अशी वस्तू आहे जी वापरताना अत्यंत काळजी घ्यावी लागते. सिलेंडर वापराताना थोडासा निष्काळजीपणाही धोकादायक ठरू शकतो. व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती एका कटरने सिलेंडर कापताना दिसत आहे. सुरुवातीला हे दृश्य पाहून लोकांना धक्का बसला त्यानंतर पुढे जे काही घडले ते पाहून सर्वजण चक्रावले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर एक व्यक्ती कटरने सिलेंडर कापतानाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून हा माणूस सिलेंडर का कापतो आहे? असा प्रश्न सर्वांना पडतो. व्हिडीओ पुढे पाहिल्यानंतर जे घडलं ते पाहून तर तुम्ही डोकचं धराल. सिलेंडर कटरने कापल्यानंतर त्याचा स्फोट झाला नाही तर त्यातून चक्का पैशांचा पाऊस झाला. होय तुम्ही योग्य तेच ऐकताय. सिलेंडरमध्ये १० रुपयांची नाणी दिसत आहे. संपूर्ण सिलेंडर नाण्यांनी खचाखच भरलेला दिसत आहेत. त्यानंतर एक व्यक्ती सिलेंडरमधील नाणी जमिनीवर ओततो….नाण्यांचा मोठा ढिग तयार होतो. व्हिडीओ पाहून लोक चक्रावले आहेत. सिलेंडरचा गल्ल्यासारखा केलेला वापर पाहून लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. हा व्हिडीओ नक्की कुठला आहे याबाबत अद्याप काही माहिती मिळालेली नाही.

हेही वाचा – जेवणातील जास्तीचं तेल काढण्याचा हटके जुगाड, ‘असा’ करा बर्फाचा वापर; Viral Video पाहून व्हाल थक्क!

हेही वाचा – “आजीची माया अशी, मुरंब्याची गोडी जशी…” मुंबईवरुन आलेल्या नातवाला पाहून आजीचा आनंद गगनात मावेना, हृदयस्पर्शी VIDEO एकदा पाहाच
व्हिडीओ tusharghongade1234 या इंस्टाग्राम अकांउटवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “जर चुकीचा सिलेंडर कापला असता तर…” कॅप्शनमध्ये सांगितल्याप्रमाणे जर घडले असते तर सिलेंडराच स्फोट झाला असता पण कोणीतरी त्याचा चक्क पैशे साठवणाऱ्या गल्ल्यासारखा वापर केला आहे. व्हायरल व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिले, “२०२३चा सर्वात मोठा गल्ला” तर दुसऱ्याने लिहिले, “इंन्कम टॅक्स विभागाला कळवले पाहिजे” तिसरा म्हणाला, १० रुपयांची नाणी कुठे गायब झाली आहे” चौथा म्हणाला, “मी हा विचार करतोय की यात पैसे टाकले कसे असतील.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Someone use real gas cylinder as coin storage bank a viral video shows a person cutting a cylinder with a cutter snk