नृत्य, गाणे, चित्रकला, हस्तकला आणि स्वयंपाकामधील आपलं कौशल्य जगासमोर दाखवण्यासाठी सोशल मीडिया हे एक उत्तम माध्यम आहे. महिलांनीही आफलं कौशल्य सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवून दिलेय. आचाल एक अनोखं कौशल्य असलेल्या महिलेचा व्हिडिओ ट्विटरवर सध्या व्हायरल होत आहे. ही महिला चक्क साडीमध्ये Back Flip Jump मारताना दिसत आहे. या महिलेने साडीत हवेत मारलेला जम्प पाहून अनेंकांनी वाह भाई वाह अशा कमेंट दिल्या आहेत.
महिला किती ग्रेसफुली फ्लिप जम्प मारते हे स्लो मोशन व्हिडिओत दिसतेय. Flip Jump मारताना या महिलेने साडी नेसली असून पायात शूज देखील नाहीत. ती ज्या ठिकाणी जम्प मारत आहे तो रस्ता देखील खडबडीत आहे. त्यामुळे सर्वांना तिचे अधिक कौतुक वाटत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. ‘India’s Got Talents’ म्हणत नेटकरी या महिलेचे कौतुक केलं आहे.
What Talent No Shoes,No proper floor.
& in a #saree Watch her land Perfectly on her hands#Indian Women are Real #SuperWomen #IncredibleIndia @KirenRijiju @BJP4India @smritiirani @chitranayal09 @Alphha9 @DetheEsha @_ankahi @DrAlkaRay2 @thakre_mohini pic.twitter.com/u6vXsurfIA— Sangitha Varier (@VarierSangitha) June 12, 2020
मात्र हा व्हिडिओ नेमका कुठला आहे? हे कळू शकलेले नाही. तसंच त्या महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. नेटकरी त्याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असून ती महिला जिमन्यास्टिक शिकली आहे का? हा प्रश्नही नेटकऱ्यांना पडला आहे.