हा अतिशय मजेशीर व्हिडीओ पाहून तुम्‍ही हसू आवरू शकणार नाही. हा अतिशय मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा पुन्हा पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये वराला पाहिल्यानंतर तुम्ही त्याला नक्कीच ‘बिचारा’ असं म्हणाल.

व्हिडीओ पाहून नक्की हसाल

देशात सध्या लग्नसराई सुरु आहे. यामुळे सोशल मीडियावर लग्नाचे खूप व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातले काही व्हिडीओ खूप मजेशीर असतात, जे पुन्हा पुन्हा बघावेसे वाटतात.

हा व्हिडीओही असाच आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला हसू आवरता येणार नाही. त्यानंतर पुन्हा पुन्हा व्हिडीओ पाहण्याचा आनंद घ्याल. हा अतिशय मजेशीर व्हिडीओ इन्स्टाग्रामवर official_viralclips नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. त्याचबरोबर लोक या व्हिडीओवर उत्स्फूर्त कमेंट करत आहेत.

( हे ही वाचा: Viral Video: कालव्याच्या काठावर उभं राहून ही तरुणी घेत होती सेल्फी, आणि मग… )

मित्रांनी वराला खुर्चीच्या मागे केले उभे

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की नवरा-नवरीची खुर्ची लग्नाच्या मंचावर ठेवण्यात आली आहे. या खुर्चीवर नवरदेवाऐवजी तीन तरुण बसलेले दिसत आहेत. खरे तर हे तिघे वराचे मित्र आहेत. दुसरीकडे, जेव्हा तुमची नजर खुर्चीच्या मागे गेली तर तेव्हा तुम्हाला दिसेल की बिचारा नवरदेव पाठी उभा आहे. वराच्या मित्रांनी त्याला उचलून खुर्चीच्या मागे उभे केले.

( हे ही वाचा: महाराष्ट्रातील ‘या’ शहरात १० हजार रुपये लिटरने विकले जात आहे गाढवाचे दूध, खरेदी करणाऱ्यांची लागलीये लाइन )

या प्रकारानंतर नवरदेवाची रिएक्शन बघण्यासारखी आहे. खुर्चीच्या मागे तो असहाय अवस्थेत उभा असलेला दिसत आहेत. आपल्या खास दिवशी आपल्या नवरीसोबत बसायचं स्वप्न पाहणाऱ्या नवरदेवाला मित्रांनी उचलून पाठी उभं केलं. नवरदेवाच्या मित्रांच्या या कृतीवर सगळ्यांनाच हसायला येत आहे.