सोशल मीडियावर एकापेक्षा एक व्हिडीओ रोज व्हायरल होत असतात. व्हिडीओमध्ये लोक आपले कौशल्य दाखवाना दिसतात. काही व्हिडीओ नेटकऱ्यांचे मन जिंकून घेतात तर काही व्हिडीओ हैराण करतात. काही व्हिडीओमध्ये अशी परिस्थिती पाहायला मिळते ज्याची कल्पना देखील आपण केलेली नसते. सध्या असाच एक व्हिडीओ चर्चेत आला आहे ज्याची चर्चा सर्वत्र होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एका मुलगा आपल्या वडिलांना सरप्राईज देण्यासाठी असे काही करतो जे पाहून वडिलांना धक्का बसतो. तरुणाचे सरप्राईज पाहून वडीलांना संताप येतो आणि ते मुलाला थेट कानाखाली मारतात. नक्की काय आहे हे प्रकरण जाणून घ्या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

म्हणून वडिलांनी मुलाच्या कानाखाली मारली

अवघ्या १८ सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये हा मुलगा क्लीन शेव्ह करून वडिलांना सरप्राईज देण्यासाठी तयार असल्याचे दिसत आहे. मुलगा कॅमेरा लावून घराच्या गेटवर उभा दिसतो. अशा परिस्थितीत वडिलांना मागून येताना पाहून तो मुलगा हसत राहतो, त्याला पाहून वडिलांची काय प्रतिक्रिया असेल या विचाराने तो मुलगा हसत राहतो, वडील येऊन विचारतात मिशी काढलीस का? मुलगा वडिलांकडे वळतो तेव्हा त्याची क्लीन शेव्ह पाहून पुढच्याच क्षणी ते मुलाच्या गालावर जोरात कानाखाली मारतात. त्यानंतर ते पुन्हा आपल्या मुलाला एका पाठोपाठ एक जोरात कानाखाली मारताना दिसत आहे. मुलाला मारताना वडील रागात म्हणतात की, “तू माझं काहीच ऐकत नाहीस” व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे.

हेही वाचा – याला म्हणतात माय-लेकाचं प्रेम! तरुणाने चक्क आईला शिकवली ड्रायव्हिंग! Videoने जिंकले नेटकऱ्यांचे मन

हेही वाचा – धक्कादायक! चिमुकल्या बाळाला हातात घेऊन धूम्रपान करतेय महिला, रिलसाठी ओलांडल्या सर्व मर्यादा, Video Viral

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये दावा करण्यात आला आहे की, ‘मुलगा आणि वडिलांमध्ये वाद झाला, मुलाने क्लीन शेव्ह करून वडिलांना आश्चर्यचकित करण्याचा प्रयत्न केला.’ आतापर्यंत २.१ दशलक्ष लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे, तर १२ हजार लोकांनी व्हिडिओला लाईक केले आहे. व्हिडिओ पाहणाऱ्या एका यूजरने लिहिले की,”काकांनी खूपच जोरात कानाखाली मारली आहे..” दुसऱ्या यूजरने लिहिले, “हे आश्चर्यकारक आहे.” तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “सिग्मा अंकल”