Son gifted Mercedes to his father: मुलं लहान असल्यानंतर आई-वडीलं मुलाची इच्छा पुर्ण करण्यासाठी अनेक गोष्टी करीत असतात. पण एकवेळ अशी येते की, मुलं आपल्या आई-वडिलांना काही अशी गिफ्ट देतात की, आई-वडिलांचे डोळे पाणावतात. वडील हे घरातील महत्त्वाचे सदस्य असतात; ज्यांच्या सावलीत कुटुंब सुरक्षित असते. आपल्या कुटुंबाची देखभाल करण्यासाठी आणि कुटुंबातील सदस्यांना आनंदी ठेवण्यासाठी ते रात्रंदिवस मेहनत करतात. वडीलही सर्वांवर प्रेम करतात; पण आपल्या भावना ते कोणाशीही शेअर करीत नाहीत. मुलं वडिलांपेक्षा आईच्या अधिक जवळ असतात. वडिलांप्रति आदरयुक्त भीती पाहायला मिळते. मात्र, वडिलांचं स्वप्न पूर्ण करणं हे कित्येक मुलांचंही एक स्वप्न असतं.
अशाच एका तरुणानं त्याच्या वडिलांचं कित्येक वर्षांपासून असलेलं स्वप्न पूर्ण केलं आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलानं वडिलांनं असं गिफ्ट दिलंय, की जे पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल. वडिलांचे अश्रू तर थांबतच नाहीयेत.
आई वडिलांच्या चेहऱ्यावर आपल्यामुळं आनंद येणं हे जगातलं सगळ्यात मोठं सुख आहे. अशाच एका तरुणानं ज्या गाडीचं वडिलांनी आयुष्यभर स्वप्न पाहिलं ती मर्सिडीज कार त्यांच्या ६५ व्या वाढदिवसाला गिफ्ट केली. तुम्हालाही वाचून अभिमान वाटला ना..असा अभिमान आणि आनंद या वडिलांनी झाला. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या तरुणानं वडिलांना कारची चावी दिली, हे पाहून त्यांना इतकं आश्चर्य वाटलं की जवळजवळ त्यांना अश्रू अनावर झाले. पुढे ते मुलाला घट्ट मिठी मारताना दिसत आहेत.सुरुवातीला त्यांना आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. नंतर त्यांना भरून आलं आणि अक्षरश:आनंदाश्रू वाहत असल्याचं दिसलं.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> “हरला तोच आहे, जो लढला नाही” कुत्रा करत होता कोंबड्याची शिकार पण १० सेकंदात पलटली बाजी; VIDEOचा शेवट पाहून व्हाल थक्क
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ adultsociety नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. एकानं म्हंटलंय की, “आयुष्यात फक्त एवढं यशस्वी व्हा” तर दुसऱ्यानं “वडिलांच्या चेहऱ्यावर हा आनंद बघण्यासाठी कष्ट करायचे आहेत” म्हंटलंय. तर आणखी एकानं, “प्रत्येक कष्टकरी तरुणाचे स्वप्न! मर्सिडीज गिफ्ट करणे नाही तर वडिलांसाठी आईसाठी आणि घरासाठी अगदी लहान गोष्ट करणे. वडिलांना मिठी मारणं आजही अनेकांसाठी स्वप्नवत आहे. वाट पाहू नका वडिलांना मिठी मारा. तुमच्या कुटुंबासाठी सर्व कष्टकरी मुलं आणि मुलींसाठी शुभेच्छा, आशा आहे की तुमचे पाकीट कधीही रिकामे होणार नाही”