Viral video: वडील हे घरातील महत्त्वाचे सदस्य असतात; ज्यांच्या सावलीत कुटुंब सुरक्षित असते. आपल्या कुटुंबाची देखभाल करण्यासाठी आणि कुटुंबातील सदस्यांना आनंदी ठेवण्यासाठी ते रात्रंदिवस मेहनत करतात. वडीलही सर्वांवर प्रेम करतात; पण आपल्या भावना ते कोणाशीही शेअर करीत नाहीत. मुलं वडिलांपेक्षा आईच्या अधिक जवळ असतात. वडिलांप्रति आदरयुक्त भीती पाहायला मिळते. मात्र, वडिलांचं स्वप्न पूर्ण करणं हे कित्येक मुलांचंही एक स्वप्न असतं. अशाच एका तरुणानं त्याच्या वडिलांचं कित्येक वर्षांपासून असलेलं स्वप्न पूर्ण केलं आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलानं वडिलांनं असं गिफ्ट दिलंय, की जे पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल. वडिलांचे अश्रू तर थांबतच नाहीयेत.
मुलानं वडिलांना दिलं सरप्राईज
या मुलाच्या वडिलांना कार चालवायला खूप आवडतं. त्यांना खूप वर्षांपासून त्यांची ड्रीम कार खरेदी करायची होती; मात्र त्यांचं हे स्वप्न स्वप्नच राहत होतं. त्यांच्या मुलाला हे माहीत होतं आणि त्यामुळेच त्यानं वडिलांना त्यांची ड्रीम कार सरप्राइज गिफ्ट म्हणून द्यायचं ठरवलं. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, या व्यक्तीची बायकोही व्हिडीओमध्ये दिसत आहे. यावेळी त्यांची बायको त्यांना एक कापडी पिशवी देते; ज्यामध्ये कारची चावी असते. मात्र, हे त्यांना माहीत नसतं. ते जेव्हा पिशवीतून कारची चावी काढतात तेव्हा त्यांना अंदाज येतो आणि ते अवाक् होतात.
त्यांना क्षणभर काहीच कळत नाही. त्यानंतर त्यांची बायको त्यांना सांगते की, कार बाहेर आहे. यावेळी मात्र त्यांना अश्रू अनावर होतात. ते आनंदाने नाचू लागतात, रडतात. त्यांच्या बायकोला मिठी मारतात आणि शेवटी धावत घराबाहेर जातात, तेव्हा गाडी बघून तर त्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. सुरुवातीला त्यांना आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. नंतर त्यांना भरून आलं आणि अक्षरश:आनंदाश्रू वाहत असल्याचं दिसलं.
VIDEO पाहून प्रत्येक पालकांचे डोळे पाणावतील, पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: बापरे! अंधेरी स्टेशनवर टीसींची फौज; २४ तासात विनातिकीट प्रवाशांकडून ७ लाख रुपये दंड वसूल
हा व्हिडीओ पाहून अनेक जण भावूक झाले आहेत. इतकं महागडं गिफ्ट वडिलांना दिल्याबद्दल अनेकांनी त्या मुलाचं कौतुक केलं आहे. कारण- वडिलांच्या अश्रूंची किंमत नक्कीच त्या कारपेक्षा जास्त आहे. मीही एक दिवस माझ्या वडिलांना कार गिफ्ट करीन. अशा प्रकारच्या अनेक प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.