Viral Video Of Poor Family : कुटुंबातील माणसांवर आरोग्याचं संकट उभं ठाकलं की, घरातील मंडळींची रुग्णलयात जाण्यासाठी धावपळ होते. पण ऐनवेळी एखाद्या रुग्णासाठी रुग्णवाहीका उपलब्ध नसेल, तर मोठी पंचाईत होते. मध्य प्रदेशच्या सिंगरौली येथे अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वडील आजारी झाल्यावर रुग्णवाहीका नसल्याने माय-लेकाने स्वत: हातगाडी चालवून सरकारी रुग्णालयाचा रस्ता गाठला. परिस्थिती गरीब असल्याने सहा वर्षांचा मुलगा आणि त्याची आई हातगाडीला धक्का देत रुग्णालयात जात असल्याचे एका व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. रस्त्यावरून जात असताना स्थानिक नागरिकांनी या कुटुंबीयांचा व्हिडीओ काढला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या गंभीर घटनेबाबत जिल्हा प्रशासनाला माहिती मिळाली. १ तासांहून अधिक वेळ रुग्णवाहीकेची वाट पाहणाऱ्या या कुटुंबला वडीलांचे प्राण वाचवण्यासाठी हातगाडीने प्रवास करावा लागला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निळ्या रंगाचा शर्ट आणि आणि जीन्स घातलेला एक लहान मुलगा वडीलांना हातगाडीवरून रुग्णालयात नेताना दिसत आहे. त्या मुलाने आणि त्याच्या आईने ३ किमीपर्यंत हातगाडी रस्त्यावरून ढकलली. एका बाजूला त्याची आई आणि दुसऱ्या बाजूला तो मुलगा हातगाडी ढकलत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. या कुंटुंबाचा धक्कादायक व्हिडीओ एका युजरने ट्वीटरवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलंय, “कदाचित मध्य प्रदेशच्या रुग्णवाहीका गरीबांसाठी नाहीत. त्यामुळेच रुग्णाला हातगाडीवरून घेऊन जाण्याची वेळ आलीय. आजारी झालेल्या माणसाला त्याचे कुटुंबीय हातगाडीला धक्का देऊन रुग्णालयात नेताना व्हिडीओत दिसत आहेत.”

नक्की वाचा – Video : मै झुकेगा नही! नागपूरच्या मैदानात डेव्हिड वॉर्नरला चढला ‘पुष्पा’ फिव्हर, व्हिडीओ होतोय व्हायरल

इथे पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सिंगरौलीचे जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले. या गंभीर प्रकारणाच्या चौकशीचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. ” रुग्णवाहीका नसल्याने कुटुंबीयांना रुग्णाला रुग्णालयात घेऊन जावे लागले. “जिल्हा शल्य चिकित्सक आणि आरोग्य अधिकाऱ्यांना रुग्णवाहीकेच्या समस्येबाबत चौकशी करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत,” अशी माहिती सिंगरौलीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी डी पी बरमन यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Son helps mother to push wooden pushcart for taking ill father to government hospital poor family shocking video clip went viral on twitter nss