Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके मजेशीर असतात की पाहून कोणीही थक्क होईल. सध्या लग्नसराई सुरू आहे. त्यामुळे लग्नातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. लहान मुलापासून ते वृद्ध लोकांपर्यंत अनेकांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. लग्नातील नवरदेव नवरीचा डान्स असो किंवा नातेवाईक मित्रमंडळींनी केलेली धमाल असो, उखाणे घेतानाचा व्हिडीओ असो किंवा हळद-संगीतचा व्हिडीओ, सोशल मीडिया चांगलेच व्हायरल होत आहे.
सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये नवरदेव डान्स करताना दिसत आहे. हा डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
जावयाची आणि सासरेबुवांची केमिस्ट्री
या व्हायरल व्हिडीओमध्ये नवरदेव सासऱ्याबरोबर डान्स करत आहे. लोकप्रिय बॉलीवूड गीत “सुनो ससुरजी ससुरजी ससुरजी ससुरजी सुनो ससुरजी अब जिद छोड़ो सुनो ससुरजी अब जिद छोडो मान लो मेरी बात दुल्हन तो जायेगी दूल्हे राजा के साथ दुल्हन तो जायेगी दूल्हे राजा के साथ” हे गीत गात नवरदेव सासऱ्यांबरोबर संवाद साधतो त्यानंतर सासरे त्यांच्या मुलीजवळ जातात आणि तिला उचलतात. जावई आणि सासऱ्यांची ही बॉडिंग पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “जावई असावा तर असा” सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
marathi_wedding_55 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “असा जावई तर माझे बाबा पण deserve करतात” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत तर काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.
यापूर्वी सुद्धा असे अनेक नवरदेवाचे डान्स व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. कधी नवरीबरोबर डान्स करताना दिसतात तर कधी मित्राबरोबर डान्स करताना दिसतात. या व्हायरल व्हिडीओमध्ये नवरदेवाने चक्क सासरेबुवांना सहभागी केले होते.