स्वामी तिन्ही जगाचा आईविणा भिकारी,असं म्हटलं जातं.आईसाठी आतापर्यंत त्यांच्या मुलांनी अनेक गोष्टी केल्याचं आपण पाहिलं आहे. कधी आईला मोठं गिफ्ट दिलं तर कधी आईला अभिमान वाटावा असं कार्य केलं. आई वडील मुलांना मोठं करण्यासाठी अनेक काबाडकष्ट करत असल्याचे आपण अनेकदा पाहिलं असेल. काही वेळा मुलं मोठी झाल्यावर याची परतफेड करताना कसे वागतात हेही आपण पाहिलं असेल. मात्र आता समोर आलेली घटना पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.
आईसाठी कायपण
बिहारच्या गया जिल्ह्यातील एक अल्पवयीन मुलगा आईसाठी चक्क किडनी विकायला निघाला आहे. या मुलाची आई आजारी पडली तेव्हा तिच्या उपचारासाठी अल्पवयीन मुलाकडे पैसे नव्हते. वडील या जगात नाहीत. घरात कमावणारं कोणी नाही. अशा परिस्थितीत अल्पवयीन मुलाने आईच्या उपचारासाठी त्याने किडनी विकण्यासाठी रांची येथील हॉस्पिटल गाठलं आणि ग्राहक शोधू लागला. यादरम्यान, त्याला ग्राहक मिळाला नाही, परंतु एक व्यक्ती भेटली. ज्याने त्याला RIMS हॉस्पिटलच्या डॉ. विकासला भेटायला लावले. डॉ. विकास यांनी अल्पवयीन मुलाला त्याच्या आईला रिम्समध्ये आणण्यास सांगितलं, जिथे तिच्यावर मोफत उपचार केले जातील.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – Video viral: चालत्या ट्रेनमधून व्यक्ती खाली पडला, तेवढ्यात महिला जवान आली अन्…
डॉ. विकास म्हणाले की, बिहारच्या गया जिल्ह्यातून एक अल्पवयीन मुलगा आला होता. त्याला वडील नाहीत. तो RIMS जवळील एका खासगी रुग्णालयात आला आणि त्याने आईच्या उपचारासाठी आपली किडनी विकायची असल्याचं सांगितलं. तो खूप गरीब आहे. त्या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीने त्याची ओळख करून दिली. यानंतर डॉ.विकास यांनी त्याला आश्वासन दिलं, की आईला रिम्समध्ये घेऊन ये, त्यांच्यावर मोफत उपचार केले जातील.