Viral Video : सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ खूप मजेशीर असतात तर काही व्हिडीओ आश्चर्यचकीत करणारे असतात.सध्या असाच एक बाप लेकाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मुलगा आणि वडील एकमेकांना तब्बल वर्षानंतर भेटतात. त्यांच्या आयुष्यातील हा सुवर्ण क्षण पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक तरुण निवांत बसलेला असतो. अचानक त्याच्या मागून त्याचे वडील येतात आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवतात. जेव्हा हा तरुण त्यांच्याकडे बघतो तेव्हा त्याला धक्का बसतो. तो उठून उभा होतो आणि दगडासारखा स्तब्ध होऊन त्यांच्याकडे बघतो.चक्क १५ वर्षानंतर त्याने त्याच्या वडिलाला बघितले. व्हिडीओमध्ये पुढे तुम्हाला दिसेल की तो वडिलाला घट्ट मिठी मारतो. हा व्हिडीओ पाहून कदाचित तुम्हाला अश्रु अनावर होणार. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : Video : गँग असावी तर अशी! रेल्वे स्टेशनवर मित्रमैत्रीणींचा बॉलीवूड गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हायरल व्हिडीओ

वडील मुलाचे नाते हे जगावेगळे असते. यांच्या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा आणि आपुलकी असते. त्यांना एकमेकांविषयी प्रेम व्यक्त करता येत नाही पण ते एकमेकांच्या भावना समजून घेतात. हा व्हिडीओ पाहून काही लोकांना त्यांच्या वडिलांची आणि मुलाची आठवण येऊ शकते.
एक्सवरील Crazy Clips या अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “त्याचा त्याच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता.”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिली. एका युजरने लिहिलेय, “मी मागील वर्षी माझ्या वडिलांना गमावले.” तर एका युजरने लिहिलेय, “त्याचे डोळे सर्वकाह सांगत आहे. खरंच खूप खास क्षण” आणखी एका युजरने लिहिलेय, “कधी कधी आपल्याला फक्त मिठीची आवश्यकता असते.” हा व्हिडीओ पाहून अनेक युजर्सना त्यांच्या वडिलांची आठवण आली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Son met his father after 15 years he could not believe his eyes and cried by watching his father emotional video goes viral son father relation ndj