आई म्हणजे ममतेचा सागर, असं म्हटलं जातं. कारण आई तिच्या मुलांवर खूप माया करते. त्यांना ती स्वत:पेक्षा जास्त जपते. स्वत: हालअपेष्टा सहन करून त्यांना लहानाचं मोठं करते. त्यांना चांगलं शिक्षण मिळावं, त्यांचे हवे ते हट्ट पूर्ण करता यावेत यासाठी दिवस-रात्र झटणारी आई खूप कमी लेकरांना कळते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ज्यांना आईचं प्रेम कधी कळत नाही, तीच मुलं आईशी वाईट वागतात. आईला नको नको ते बोलतात, तिला वाईट वागणूक देतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एक मुलगा रेल्वेमध्ये आपल्या आईला बडबडतोय आणि आई बिचारी गप्प उभी आहे. नेमकं प्रकरण काय? ते जाणून घेऊ…

हेही वाचा… “अर्ध्या तासांनी या” हे सांगितल्यावर महिला कर्मचाऱ्याच्या केबिनची काच फोडून तो आत घुसला, पुढे तरुणाने जे काही केलं ते पाहून उडेल थरकाप

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये एक आई आणि मुलगा रेल्वेतून प्रवास करतायत, असं दिसतंय. यादरम्यान मुलगा आपल्या आईवर ओरडताना दिसतोय. हातवारे करीत जोरजोरात बोलत असताना तो रागात असल्याचं दिसून येतंय. आपलाच मुलगा सगळ्यांसमोर आपल्याला ओरडतोय हे पाहून बिचारी आई इथे-तिथे पाहू लागते आणि शांतपणे मुकाट्यानं सगळं सहन करीत मुलाचं ऐकून घेते. तरीही मुलाची काही ना काही बडबड सुरूच असते.

हा व्हायरल व्हिडीओ @chanakyasiddhant या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओला ‘असं नका करू रे’, अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच या व्हिडीओला तब्बल ७.१ दशलक्ष व्ह्युज आले आहेत.

हेही वाचा… बापरे! पायऱ्यांवरून घसरत खाली आली अन्…., रेल्वे स्थानकावर महिलेला आली चक्कर, पण पुढे जे घडलं ते पाहून तुमचाही राग होईल अनावर, पाहा VIDEO

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर संताप व्यक्त करीत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजंने कमेंट करीत लिहिलं, “देवा, अशी मुलं कोणत्याच आई-वडिलांना नको देऊस.” दुसऱ्यानं, “कृपया आपल्या आई-वडिलांबरोबर असं वागू नका”, अशी कमेंट केली. तिसऱ्यानं कमेंट करत लिहिलं, “बिचारी आई त्याचं ऐकून घेतेय. असं तुमच्या बॉसशी बोलून दाखवा.” एकानं, “मुलगा म्हणून अपयशी ठरला”, अशी कमेंट केली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Son shouting at mother in a railway viral video on social media dvr