Son’s Thoughtful Surprise Makes Dad Dance with Joy : वडील आणि मुलांचं नातं हे सर्वात खास नातं असते. वडीलांचा आपल्या लेकावर खूप प्रेम असते. मुलांसाठी कोणतेही कष्ट करण्यासाठी वडील नेहमी सज्ज असतात. आयुष्यात काहीही झाले तरी वडील नेहमी आपल्या लेकांच्या पाठीमागे उभे राहतात. जितकं प्रेम वडील मुलांवर करतात तेवढं प्रेम मुलंही आपल्या वडीलांवर करतात. पालकां नेहमी आपल्या मुलांना काही ना काही देत असतात पण वडीलांसाठी मुलांनी दिलेली भेट अत्यंत खास असते. असाच एक सुंदर क्षण एका व्हायरल व्हिडीओमध्ये कैद झाला आहे. एक मुलगा आपल्या वडीलांना हटके स्टाईलमध्ये गिफ्ट देतो. गिफ्ट मिळाल्यानंतर वडीलांची प्रतिक्रिया पाहून नेटकऱ्यांना हसू आवरणे अशक्य झाले आहे. व्हायरल व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बाप-लेकाचा Video Viral

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात पण काहीच व्हिडिओ असे असतात जे नेटकऱ्यांच्या मनाला भिडतात. सध्या अशाच एका व्हिडीओची जोरदार चर्चा होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक मुलगा आपल्या हटके स्टाईलमध्ये वडीलांसाठी घड्याळ देतो. मुलगा प्रथम टिव्हीवरील गाण्याचा आवाज वाढवतो आणि नाचत नाचत वडीलांना गिफ्ट देतो. वडीलही नाचत नाचत मुलाकडून गिफ्ट घेतात आणि हातात घड्याळ घालतात. लेकाकडून मिळालेल्या गिफ्टचा आनंद वडीलांच्या चेहऱ्यावर दिसतो आहे. वडील आनंदाने नाचत नाचत घड्याळ मुलाच्या आईला दाखवतात. वडीलांचा डान्स पाहून नेटकरी पोट धरून हसत आहे.

हेही वाचा –“जितके तुम्ही विरोधात तितके आम्ही….”; कारवरील पाटीची का होतेय एवढी चर्चा, पाहा Viral Video

इंस्टाग्रामवर success_guru_marathi नावाच्या पेजवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. Viral Video शेअर करताना कॅप्शनमध्ये फक्त प्रेम असे लिहिले आहे. व्हायरल व्हिडिओ नेटकऱ्यांनी प्रचंड आवडला आहे. नेटकऱ्यांनी कमेट करून वडीलांना भेट देणार्‍या मुलांचे आणि मुलाकडून भेटवस्तू मिळाल्यानंतर आनंदाने नाचणाऱ्या वडीलांचे तोंडभरून कौतुक केले आहे. एकाने लिहिले की,”आयुष्यात आनंदासाठी लाख-कोटी रूपये असणे गरजेचे नाही तर लाखो कोटीमध्ये एक असा बाप असणे गरजेचे आहे, आज कोटींचा व्यवसाय आहे माझा पण हा आनंद नाही”

हेही वाचा – “असे मित्र कोणालाही भेटू नये”, भर पावसात मैत्रिणीबरोबर डान्स करत होता तरुण अन् मित्रांनी….Video Viral

=

हेही वाचा – पुण्यात कशासाठी झाली आहे तरुणाची एवढी गर्दी? पाहा Video होतोय Viral

दुसऱ्याने लिहिले की, “भाई खूप नशिबवान आहेस तू, तुझे वडील एवढे मित्रासारखे आहेत”

तिसऱ्याने लिहिले की, याला म्हणतात प्रत्येक क्षण दिलखुलास जगणे! तुम्ही नेहमी असेच खुश राहावे ही सदिच्छा!”

चौथ्याने लिहिले, लोकांनी म्हटले पाहिजे,”बाप लेक असावे तर असे”

तिसऱ्याने लिहिले की,”मस्त रे भावा याला म्हणतात खर आयुष्य याला म्हणतात मुलगा आणि वडील यांच्यातील सुंदर नातं”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Son surprise gift dad priceless reaction father son duo shares heartwarming dance moment laugh out loud moment unconditional bond snk