प्रत्येक पालकांचे स्वप्न असते की, आपल्या मुलांनी खूप मोठं व्हावे, स्वत:च्या पायावर उभे राहावे, चांगली नोकरी मिळावी, एखादा अधिकारी व्हावे. त्यासाठी आई-वडील खूप कष्ट करतात. आपली हौस-मौज बाजूला ठेवून आपल्या मुलांना शिकवतात. दुसरीकडे एक हक्काची नोकरी मिळावी यासाठी कित्येक तरुण-तरुणी रोज संघर्ष करतात. कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करतो तर कोणी पोलीस भरतीच्या परीक्षेची तयारी करत आहे. अनेक विद्यार्थी आपल्या पालकांना सोडून आणि आपले गाव सोडून शहरात शिक्षण किंवा नोकरीसाठी येतात. पण काही मोजक्याच तरुणांच्या प्रयत्नांना यश मिळते. अशाच नव्याने पोलिस दलात झालेल्या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आई वडीलांचे उपकार कोणीही फेडू शकत नाही

नव्याने पोलिस दलात भरती झालेल्या प्रशिक्षणार्थींचा दिक्षांत सोहळा पार पडतो. खडतर प्रवास करून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींसाठी हा दिक्षांत सोहळा म्हणजे अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण असतो. या सोहळ्यामध्ये प्रशिक्षणार्थींचे पालकही उपस्थित आहे. पालकांच्या समोर पहिल्यांदा वर्दीमध्ये उभे राहण्याची संधी या सोहळ्यात मिलते. आपल्या मुलाला पोलिसांच्या वर्दीमध्ये पाहून आई-वडीलांच्या डोळ्यात अश्रू दाटतात तर कोणी आपल्या आई-वडीलांना घट्ट मिठी मारून रडताना दिसतात. अशाच सोहळ्यातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एक तरुण पोलिसांच्या वर्दीमध्ये उभा असल्याचे दिसत आहे. आपल्या आई – वडीलांसमोर पोलिसांच्या वर्दीसमोर उभा राहतो आणि प्रथम तो त्यांना सलाम करतो. त्यानंतर तो आपल्या आई-वडीलांजवळ येतो आणि आपल्या डोक्यावरील टोपी काढून त्यांच्या डोक्यावर ठेवतो. आपल्या आई-वडीलांच्या पाया पडून त्यांचा आर्शिवाद घेतो आणि त्यांच्याबरोबर फोटो काढतो. व्हायरल व्हिडिओ पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले आहे.

हेही वाचा – ‘बाई…हा काय प्रकार!’ बसच्या तुटक्या पायऱ्या पाहून काळजात भरेल धडकी, बसमध्ये चढायचे कसे? पाहा Viral Video

येथे पाहा Video

हा व्हिडिओ पोलिस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला प्रेरणा देणारा आहे.

हेही वाचा – “नातं इथपर्यंत पोहचलं पाहिजे!” थरथरत्या हातांनी आजोबांनी आजीच्या गळ्यात घातली वरमाला”, Viral Video एकदा बघाच

इंस्टाग्रामवर cops_santoshs_1211 नावाच्या पेजवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “स्वप्नपूर्ती….आई वडील माझे”

व्हिडिओ अनेक लोकांना प्रचंड आवडला आहे. जवळपास एक लाख लोकांनी व्हिडीओला पसंती दर्शवली आहे. व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी तरुणाचे कौतूक केले आहे.

व्हिडीओवर कमेंट करताना एकाने लिहिले की,”माझ्या डोळ्यात पाणी आलं भाऊ, आई वडिलांना असचं प्रेम दे कायम”

दुसरा म्हणाला, “किती आनंदाचा क्षण असेल तो आई-वडीलांसाठी”

तिसरा म्हणाला की, हे सगळं फक्त आई-वडीलांसाठीच. जिंकला भाऊ!

चौथा म्हणाला, “कष्ट प्रामाणिक असतील तर नशीब सुद्धा झुकतं”