हरियाणातील भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगट आता या जगात नाही. वयाच्या ४१ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले आहे. या बातमीने त्याच्या लाखो चाहत्यांना धक्का बसला आहे. दरम्यान, सोनाली फोगटचा एक जुना व्हिडीओ ट्विटरवर पुन्हा व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती एका सरकारी कर्मचाऱ्याला चप्पलने मारहाण करताना दिसत आहे. हा व्हिडीओ हरियाणातील हिसार येथील अनाज मंडी येथील आहे. सोनाली फोगटने अश्लील शेरेबाजी केल्याच्या आरोपावरून कर्मचाऱ्याला चप्पलने मारहाण केली होती.

अनाज मंडीचा कर्मचारी सुलतान सिंगवर सोनाली फोगटवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप होता. यानंतर सोनाली फोगट रागाने इतकी भडकली की तिने लगेच तिची चप्पल काढून तेथील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली होती. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सोनाली फोगट कर्मचाऱ्यावर ओरडताना दिसत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर राजकारण चांगलेच तापले होते. काँग्रेसनेही याला मुद्दा बनवण्याचा प्रयत्न केला होता.

( हे ही वाचा: VIDEO: आईची माया! भुकेल्या कुत्र्यांना महिलेने पाजले म्हशीचे दूध; या हृदयस्पर्शी व्हिडीओने जिंकली लोकांची मने)

येथे व्हिडीओ पहा

( हे ही वाचा: Optical Illusion: चित्रात लपलेल्या मुलीला तुम्ही शोधू शकता का? ९९% लोकं ठरलीत अपयशी)

सोनाली फोगटने २०१९ च्या हरियाणा निवडणुकीत आदमपूर मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. कुलदीप बिश्नोईविरुद्ध ती मैदानात होती. यानंतर त्याला बिग बॉसमधून आणखी लोकप्रियता मिळाली. बिग बॉस १४ मध्ये ती जवळपास ३३ दिवस घरात राहिली होती. यादरम्यान तिचे अनेक सदस्यांसोबत भांडण देखील झाले होते.

Story img Loader