Sonia Gandhi With cigarette Viral Photo: लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असलेला एक फोटो दिसून आला ज्यात तरुणपणीच्या सोनिया गांधी दिसत असल्याचा दावा केला जात आहे. युजर्सनी या फोटोमध्ये सोनिया गांधी यांच्या हातात सिगारेट स्पॉट केली आहे. तरुणपणीची एक इटलीतील महिला, वर्ष साधारण १९६० असावं, ओळखणऱ्याला ८५०० रुपये अशा वेगवेगळ्या कॅप्शनसह हा फोटो शेअर केला जात आहे. आम्ही याबाबत तपास केला असता आम्हाला यामागील खरी बाजू दिसून आली. काय खरं, काय खोटं, चला पाहूया..
काय होत आहे व्हायरल? (Sonia Gandhi Viral Photo)
X यूजर Krishna Azad ने व्हायरल फोटो आपल्या प्रोफाइलवर शेअर केला होता.
इतर वापरकर्ते देखील हेच चित्र शेअर करत आहेत.
हे ही वाचा<< Video: “भीक नको कर्ज द्या आणि..”, अशा कॅप्शनसह नितीश कुमारांचा मोर्चा व्हायरल; भाजपाकडे केलेली मागणी खरी की खोटी?
तपास:
आम्ही इमेजवर रिव्हर्स इमेज सर्च करून आमचा तपास सुरु केला. रिव्हर्स इमेज सर्च दरम्यान आम्हाला टंबलरवर अपलोड केलेला फोटो आढळला. चित्र सारखेच होते, मात्र स्त्री वेगळी होती आणि ती सोनिया गांधींसारखी दिसत नव्हती.
नीट तपासल्यावर, आम्हाला आढळले की फोटोग्राफर फर्जद सरफराजी यांनी २०१२ मध्ये हा फोटो क्लिक केला होता. हा फोटो अकरा वर्षांपूर्वी पोस्ट केला गेला होते. फोटोवर कॉपीराइट देखील नमूद केला होता.
हे ही वाचा<< Weird Animal Spotted: समुद्री गाय व वाघाचा लागला शोध? Video मध्ये दिसणाऱ्या गर्दीतूनच समोर आलं सत्य, पाहा तपास
आम्ही पाहिले की चित्रात सोनिया गांधींचा चेहरा रेखाटल्यासारखा दिसत होता, असं टेक्शचर साधारणपणे एआयने बनवलेल्या फोटोंच असतं, आणि म्हणून आम्ही AI डिटेक्टरद्वारे व्हायरल फोटो तपासला ज्यात आमच्या असे लक्षात आले की फोटो AI टूल्स वापरून एडिट केला गेला आहे. काही डिटेक्टर्सनी फोटोमध्ये डीपफेक पद्धती वापरल्याचे सुद्धा सूचित केले.
निष्कर्ष: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचा सिगारेट हातात घेऊन व्हायरल झालेला फोटो बनावट आहे. व्हायरल दावे खोटे आहेत.