अभिनेता सोनू सूद नेहमीच समाजसेवेमध्ये अग्रेसर असल्याचे पाहायला मिळते. गरीब विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देणे असो किंवा त्यांच्यासाठी ऑनलाईन क्लासेसची सुविधा करणे असो, सोनू सूदने देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी नेहमी मदतीचा हात पुढे केला आहे. लॉकडाउनमध्ये सर्व वाहतूक सेवा ठप्प असताना असंख्य कामगारांना त्यांच्या गावी पोहोचण्यासाठी सोनू सूदने मदत केल्याचे आपण पाहिलेच. असा हा रिल लाईफ हिरो रिअल म्हणजेच खऱ्या आयुष्यातही हिरोची भूमिका उत्तमरित्या निभावत चाहत्यांची मनं जिंकत आहे. आता आणखी एका गोष्टीने सोनू सूदने चाहत्यांची मनं जिंकली आहेत, त्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोनू सूदने काही दिवसांपुर्वी ट्रेनने प्रवास केला याबाबत त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सोनू सूदजवळ त्या प्लॅटफॉर्मवरचा एक कुत्रा बसलेला दिसत आहे. सोनू सूदने या व्हिडीओमध्ये म्हटले आहे, “इथे मला एक मित्र भेटला आहे. तुम्ही कुठेही असे प्राणी भेटले आणि तुम्ही त्यांना जवळ घेत त्यांचे लाड केले तर ते नेहमी त्याला प्रतिसाद देतात. आता हा माझ्याजवळ येउन बसला आहे आणि याला इथून जायची इच्छा होत नाहीये. मलादेखील याला घरी घेऊन जावेसे वाटत आहे. तुम्हाला जर कुठे असे प्राणी दिसले तर त्यांना जीव लावा.” हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधून सोनू सूदने भटक्या कुत्र्यांवर आणि त्यांसारख्या प्राण्यांवर जीव लावण्याचे आवाहन केले आहे.

आणखी वाचा : चिमुकल्याने या पुतळ्याला मिठी मारली अन्…; निरागसता म्हणजे काय दाखवणारा Viral Video एकदा पाहाच

सोनू सूदचा व्हायरल होणारा व्हिडीओ :

सोनू सूदने शेअर केलेल्या या व्हिडीओला ५७ लाखांहून अधिक व्ह्यूज आणि १० लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. सोनू सूदचे प्राण्यांवर असणारे प्रेम या व्हिडीओतून दिसून येत आहे. या व्हिडीओने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. मागच्या वर्षी सोनू सूदच्या मुलाने अलिबाग येथून रस्त्यावर फिरत असणाऱ्या एका कुत्र्याच्या पिल्लाला आश्रय देत त्याला दत्तक घेतले होते. याचा फोटो अभिनेत्याने ट्विटरवर शेअर केला आहे.

Viral Video : त्याने चक्क सिंहीणीला घाबरवण्याचे धाडस केले, पुढे काय झाले एकदा पाहाच

यातून पिता-पुत्र दोघांचाही प्राण्यांवर जीव असल्याचे स्पष्ट होते. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे सोनू सूद पुन्हा एकदा त्याच्या नम्र स्वभावामुळे चर्चेत आला आहे.