पोल्का डॉटचे फ्रॉक आणि पोनी टेल बांधून अमूलच्या सगळ्याच उत्पादनावर दिसणारी अमूल गर्ल आता लवकरच नव्या रुपात तुम्हाला भेटायला येणार आहे. जाहिरातीतून दिसणारी अमूल गर्ल आता व्यंगचित्रांतून विविध वर्तमानपत्र आणि सोशल मीडियावर दिसत आहे. पण लवकरच अमूल गर्ल  कप, किचेन, फ्रिज मॅगनेट आणि फ्रॉक्स यासारख्या अनेक उत्पादानांवर दिसणार आहे. अमूल कंपनी लवकरच अमूल गर्लचे चित्र असलेली उत्पादने काढणार आहे.

VIDEO : ९० च्या दशकातील प्रसिद्ध कार्टुन ‘डक टेल्स’ पुन्हा येणार !

अमूलमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन वर्षांत अमूल नवीन उत्पादने घेऊन येणार आहे. फ्रिज मॅगनेट, किचेन, मग आणि पोल्का डॉट असलेले फ्रॉक अशी अनेक उत्पादने यावर्षी अमूल बाजारात आणणार आहे. ही सारी उत्पादने देशभरातील अमूलच्या ८ हजारांहूनही अधिक अमूल डेअरी केंद्रावर विक्रिसाठी ठेवण्यात येणार आहे. अमूल गर्ल ही जरी छोटीशी असली तरी तिला आता पंन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत.  अमूल कंपनीची एकंदर कारकिर्द, या कंपनीचा चेहरा असलेली अमूल गर्ल आणि या संपूर्ण प्रवासाची माहिती सांगणा-या ‘अमूल इंडिया ३.०’ पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. यानिमित्ताने अमूल या अमूल गर्लला वेगळ्या रुपात ग्राहकांसमोर आणणार आहे.

VIDEO : सिंहाच्या पोशाखातील चिमुकल्यासमोर साक्षात वनराज अवतरतात तेव्हा!

Story img Loader