वाईल्ड फोटोग्राफर किंवा प्राण्यांवर लघुपट बनवणा-या कॅमेरामनला या जंगलात चांगले वाईट असे कितीतरी अनुभव येत असतील ना. पंधरा वीस मिनिटांचा एक माहितीपट जरी बनवायचा असला तरी त्यामागे वर्षांनुवर्षांची मेहनत त्याला करावी लागते. कित्येक दिवस, कित्येक रात्री कॅमेरामन त्या जंगलात राहून अचूक क्षणांची वाट पाहत असतो. कधी हिंस्र प्राण्यांचा धोका, तर नैसर्गिक आपत्ती, तर कधी कधी प्राण्यांचेच विचित्र वागणं अशा अनेक संकटांचा सामना करत त्यांना सर्वोत्तम क्षण कॅमेरात कैद करायचे असतात. जंगलातले असे अनेक चांगले वाईट अनुभव त्यांच्या मनात क्लिक झालेले असतात, याचे गंमतीदर किस्से त्यांच्या तोंडून ऐकण्यासारखे असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

VIRAL VIDEO: झेब्राचा पोषाख घालून गेलेल्यांवर खऱ्या सिंहिणींचा हल्ला!

एका साऊथ आफ्रिकन कॅमेरामनला असाच एक मजेशीर अनुभव जंगलात आला. गेंड्यांच्या होणा-या शिकारीवर तो एक माहितीपट बनवत होता. या चित्रिकरणादरम्यान मादी गेंडा समोर आली. अनेकदा माणसांना पाहून या प्राण्याने हल्ला करण्याच्या अनेक घटना घडतात पण यावेळी मात्र अगदी उलटं झालं. या कॅमेरामनच्या शेजारी येऊन ती उभी राहिली. कॅमेरामननेही तिला कुरवाळलं, त्यामुळे बराच वेळ ती त्याच्या शेजारी उभी होती. अनेकदा माणसं दिसली की हे प्राणी हल्ला करतात, त्यांच्या हल्ल्याने अनेकांचे जीव गेले आहेत. जंगलात लपवलेले छुपे कॅमेरे जरी त्यांच्या नजरेस पडले तरी ते तोडून टाकतात, पण या छायाचित्रकारला यापेक्षाही वेगळा अनुभव आला. हा अनुभव अगदी अनपेक्षित असला तरी भविष्यात एखादा गेंडा जवळ आला तर चुकूनही त्याला हात लावण्याचे धाडस करू नका अशीही सूचना या कॅमेरामनने दिली.