‘दोन बायका अन् फजीती ऐका’ या सिनेमाबाबत तुम्ही ऐकलं असेल, पण हा तर सिनेमा नाही, नुसता ट्रेलरंच वाटतोय. कारण ‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’….हे वाचून तुम्हाला आर्श्चयाचा धक्का नक्कीच बसला असेल. आफ्रिकेतील युगांडात राहणाऱ्या मुसा हसादजीने हद्दच पार केलीय. मुसाच्या कुटुंबात एक,दोन नाही तर तब्बल ७०० हून अधिक सदस्य आहेत. होय हे खरं आहे, कारण मुसाला १० पत्नी, ९८ मुलं आणि ५६८ नातलग आहेत. जगातील सर्वात मोठं कुटुंब मुसाच्या घरी असल्याचं बोललं जात आहे. एका आंतरराष्ट्रीय प्रसार माध्यमाने मुसाच्या कुटुंबाची मुलाखत घेतलीय. ६७ वर्षीय मुसा आफ्रिकेच्या युगांडातील बुटालेजा जिल्ह्यातील रहिवासी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – चॅटिंगच नाही तर आता WhatsApp वर शॉपिंगही, नंबरशिवाय युजरला शोधता येणार, भन्नाट फिचरबाबत जाणून घ्या सविस्तर

मुसाने मुलाखतीत काय सांगितलं?

एक मुलाखती दरम्यान मुसाने त्याच्या कुटुंबियांबद्दल माहिती दिली. तो म्हणाला, “माझ्या दहा पत्नी आहेत. आम्ही सर्व एकाच घरात राहतो. आम्हाला ९८ मुलं आहेत. आमच्या कुटुंबात ५६८ नातलग आहेत. मला देवाच्या कृपेनं मोठं कुटुंब मिळालं आहे. मी युगांडात एकमेव आहे, ज्याच्या दहा पत्नी आहेत.” मुसाला त्याच्या सर्व मुलांची नावाबाबत विचारले असता तो म्हणाला, मला सर्वांची नावं आठवत नाहीत. मुसा पुढे म्हणाला, मी सतरा वर्षांचा असताना पहिला मुलगा जन्माला आला. माझी मुलं लग्नबंधनातही अडकली आहेत. काही मुलं शिक्षण घेत आहेत. माझ्या मुलांसाठी मी घराजवळज झोपडपट्टी बांधली आहे. हनीफा हसादजी ही माझी मोठी पत्नी आहे. काकाजी ही सर्वात लहान पत्नी आहे. मला आता नवीन लग्न करायचं नाही.

World Biggest Family, Uganda

आणखी वाचा – “सागर किनारे दिल ये पुकारे” पठ्ठ्याचा नादच खुळा, चक्क मगरीची केली मसाज, ”पुढे जे घडलं…”, थरारक Viral Video पाहाच

नवीन लग्न केलं तर.., मुसाची पत्नी म्हणाली…

मुसाची सर्वात लहान पत्नी काकाजीनं सांगितलं की, जर माझ्या पतीनं पुन्हा लग्न केलं, तर माझी काही हरकत नाही. कारण तो आमच्या सर्वांची काळजी घेतो. आम्ही सर्व एकाच घरात राहतो. युंगांडाच्या विविध ठिकाणी आमच्या सर्वांच माहेर आहे. मुसाने जेव्हा पहिलं लग्न केलं, त्यावेळी त्याने पत्नीला हुंडा म्हणून तीन गाय आणि चार बकरी दिल्या होत्या. दुसऱ्या पत्नीलाही अशाच प्रकारे हुंडा दिला. दोन लग्न झाल्यानंतर बकरींची संख्या कमी होत आहे, याबाबत मुसाला अंदाज आला. त्यानंतर त्याने पुढील लग्नात हुंडा म्हणून दोन गाय द्यायला सुरुवात केली.

मुसाने सांगितलं की…..

“ज्या कुटुंबात माझा जन्म झाला होता, त्या कुटुंबात फक्त दोनच सदस्य होते. कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न कमी होतं. याच कारणामुळं शाळा मध्येच सोडावी लागली. पहिल्या लग्नानंतर मी बाजरा विक्रीच्या व्यवसायाला सुरुवात केली. मला या व्यवसायात खूप यश मिळालं. मी गाय खरेदी केल्या. बकरी खरेदी करुन गोट फार्मचा व्यवसायही सुरु केला. झिरोपासून मी सुरुवात केली आणि आता माझ्य मेहनंतीचं फळ मिळताना दिसत आहे.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: South african man married with ten girls having 98 children 568 grandchildren world biggest family in uganda nss