दक्षिण आफ्रिकेमधील लोकप्रिय ओपेरा म्युझिक स्टार प्रिटी येंडेने फ्रान्समधील विमानतळावर आपल्याला आरोपीसारखी वागणूक दिल्याचा आरोप केलाय. इटलीवरुन फ्रान्सची राजधानी असणाऱ्या पॅरिसला जाताना चार्ल्स द गॉल विमानतळावर आपल्याला अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्याचा दावा येंडेने केलाय. विमानतळावरील अधिकाऱ्यांनी एखाद्या आरोपीप्रमाणे संपूर्ण कपडे काढून माझी तपासणी केल्याचा आरोप या गायिकेने केलाय. फ्रान्समधील अधिकाऱ्यांनी माझा फोन आणि सामानही ताब्यात घेतलं होतं. तसेच मला माझ्या जवळच्या नातेवाईकांचे आणि मित्रांचे क्रमांक लिहून दे असंही सांगण्यात आल्याचं ही गायिका म्हणाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नक्की वाचा >> …म्हणून फेसबुकवरील Haha इमोजीविरोधात मुस्लीम धर्मगुरुने काढला फतवा

देशातून परत पाठवण्यासाठी ज्या लोकांना आणलं जातं त्या रिटेन्शन सेलमध्ये येंडेला घेऊन जाण्यात आलं आणि तेथील लॅण्डलाइनवरुन तिला जवळच्या नातेवाईकांना फोन करण्यास परवानगी दिली. त्यानंतर तिला अधिकारी प्रिझन हॉटेलमध्ये घेऊन गेले. हा सारा प्रकार गैरसमज झाल्याने घडला आहे असं येंडेनी ओपेरा वायरशी बोलताना सांगितलं. या घटनेमागे वर्णद्वेष किंवा इतर कोणताही वाईट हेतू नव्हता असं या गायिकेने स्पष्ट केल्याचं ‘द न्यू यॉर्क टाइम्स’ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

नक्की वाचा >> उसेन बोल्टच्या जुळ्या पोरांची नाव ऐकून नेटकरी म्हणाले, “घरात वादळी वातावरणाची शक्यता”

येंडेने दिलेल्या माहितीनुसार फ्रान्समधील अधिकारी मिलानमधून देण्यात आलेल्या, “परमेसो डि सोगिओर्नो इम्प्रोविसोरी” कागदपत्रांबद्दल साशंक होते. पॅरिसमधील डेस चॅम्पस-एलिसीज ओपेरा हाऊसमधील एका कार्यक्रमासाठी पॅरिसमध्ये येण्यासंदर्भातील ही कागदोपत्री परवानगी होती. कागदपत्रांवर विश्वास न बसल्याने त्यांनी माझी तपासणी सुरु केली. त्यांनी आधी मला माझे बूट काढण्यास सांगितलं. मात्र एवढी सखोल तपासणी का केली जात आहे याबद्दल मला काहीच माहिती देण्यात आली नव्हती असा दावा येंडेने केलाय.

नक्की वाचा >> हे आहे ‘जगातील सर्वात शक्तीशाली चुंबक’; विमानवाहू युद्धनौकेलाही सहा फुटांपर्यंत उचलण्याची ताकद

फ्रान्समधील एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार येंडेकडे यासंदर्भात चौकशी करण्यात आली असता ती दक्षिण आफ्रिकेच्या पार्सपोर्टवर प्रवास करत होती. तिच्याकडे फ्रान्सचा व्हिजा नव्हता. त्यानंतर तिला सिंगल एन्ट्री व्हिजा देण्यात आला आणि तेव्हाच तिची पोलिसांनी सुटका केली.

नक्की पाहा >> Photos: अबब… काही किलोमीटरपर्यंत पसलं आहे हे कोळ्यांचं जाळं; जाणून घ्या नक्की काय घडलंय

योग्य कागदपत्र नसतील तर कोणत्याही व्यक्तीला स्ट्रिप-सर्च करणे म्हणजेच संपूर्ण कपडे काढून तपासणी करणे ही सामान्य गोष्ट असल्याचं या अधिकाऱ्याने सांगितलं. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ही तपासणी केली जाते. आपल्या कार्यक्रमासाठी विमानतळाबाहेर जाण्यासाठी परवानगी दिल्यासाठी येंडेने पोलिसांचे आभार मानल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितलं आहे.