आपलं घर म्हणजे आपला एक सुरक्षित कोपरा असतो. दिवसभर दमणूक झाल्यानंतर विसाव्याचे चार क्षण मिळतात ते इथेच. आपल्या घरात आपल्याला सुरक्षित वाटतं. निर्धास्त वाटतं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आपण बाहेरून आलो, आपल्या सोफ्यावर बसलो. आणि रिलॅक्स होत असतानाचा आपल्या शेजारी दिसला तो एक कोब्रा. आणि साधासुधा कोब्रा नाही तर आपल्या तोंडातून समोरच्या लक्ष्यावर विषाचा फवारा मारणारा कोब्रा तर आपल्याला कसं वाटेल?
आता विषाचा फवारा मारणारा कोब्रा हे काय प्रकरण आहे हे पाहण्यासाठी खालचा जीआयएफ व्हिडिओ पहा.
नुसत्या चावणाऱ्या कोब्रापेक्षा भयानक प्रकरण आहे हे. म्हणजे तुम्हाला मारण्यासाठी या कोब्राला चावाही घ्यावा लागत नाही. तुम्ही साधारण मीटर दीड मीटर अंतरावर असलात तरी तुमची ‘खलीबली’ हा कोब्रा करू शकतो.
साऊथ आफ्रिकेतल्या एका घरात हा कोब्रा घुसला होता. अशा प्रकारच्या आफ्रिकेतल्या कोब्रांना मोझांबिक स्पिटिंग कोब्रा म्हणतात.
या घरातली महिला तिच्या सोफ्यावर बसली होती. आपल्या काही महिन्यांच्याच बाळाला दूध पाजून तिने त्याला आपल्या शेजारी सोफ्यावर बसवलं. आणि ती काही कामासाठी उठणार इतक्यात तिच्या बाळाच्या सोफ्यावर तिची नजर गेली आणि तिच्या जिवाचा थरकाप उडाला….
तिच्या लहान बाळाच्या काही फुटांवरच एक मोझांबिक कोब्रा बसला होता! या अत्यंत विषारी कोब्राच्या एका चाव्यानिशी तिच्या लहानग्याच्या जिवावर बेतू शकलं असतं. ती तिच्या मुलाला उचलून दूर करणार इतक्यातच या कोब्राने त्याच्या विषाचा फवारा मारला.
त्याचं हे विष आपल्या मुलावर पडू नये म्हणून या महिलेने त्याला मागे खेचून विषाचा फवारा आपल्या अंगावर घेतला. हे विष तिच्या डोळ्यात गेलं आणि तिच्या डोळ्यांची भयानक आग होऊ लागली. या कोब्राचं विष डोळ्यात गेलं तर दृष्टीही जाऊ शकते.
Viral Video: त्याच्या आईला शोधायला ते वणवण भटकले!
हे विष डोळ्यात गेल्यावर साहजिकच तिच्या डोळ्यांची प्रचंड आग होऊ लागली. तिने लगेच बाथरूममध्ये जात तिच्या डोळ्यांवर भरपूर पाणी मारलं. सापाचं विष पाण्याने सहज वाहून जाण्यासारखं नसतं. त्यासाठी खूपच पाणी लागतं. पण या महिलेने तिच्या डोळ्यांवर लगेचच पाणी मारल्याने विष तिच्या डोळ्यात फार आतमध्ये गेलं नाही. आणि तिने तातडीने अँम्ब्युलन्स बोलावल्याने पुढचा अनर्थ टळला.
हे असं काही आपल्यासमोर यायला नको भाऊ!