Unique Compitition Viral Video : सध्याच्या जगात मोबाईल किंवा इतर डिजिटल गॅजेट्सशिवाय कोणी एक तासही राहू शकत नाही. प्रत्येक जण मोबाईल नाही, तर लॅपटॉप अशा कोणत्या ना कोणत्या गॅजेट्ससमोर बसलेले दिसतात. लोक या गॅजेट्सच्या व्यसनात अडकल्याची स्थिती आहे. या गॅजेट्सचा लोकांच्या मानसिकतेवर इतका परिणाम झाला आहे की, काही सेकंद जरी मोबाईल किंवा आवडती गॅजेट्स बाजूला नसेल तरी ते बैचेन होतात. अशा प्रकारे मोबाईल आणि इतर डिजिटल गॅजेट्सच्या व्यसनापासून लोकांना मुक्त करण्यासाठी एका देशाने एक अनोखा मार्ग शोधून काढला आहे. या देशात दरवर्षी इथे एक अनोखी स्पर्धा भरवली जाते, जिला ‘स्पेस आउट’असे म्हणतात. या स्पर्धेत ९० मिनिटांसाठी काहीच न करता एका जागी बसायचे आणि भरघोस बक्षीस घेऊन जायचे. या अनोख्या स्पर्धेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना ९० मिनिटे काही न करता, फक्त एका जागी काहीच हालचाल न करता बसून राहायचे आहे, कोणाशीही न बोलता, हालचाल न करता आणि मोबाईल किंवा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचा वापर न करता फक्त एका जागी बसून राहायचे आहे. यादरम्यान, स्पर्धकांना फक्त शांत बसून त्यांच्या हृदयाचे ठोके नियंत्रणात ठेवावे लागतात.

विजेता कसा ठरवला जातो?

‘स्पेस आऊट’ स्पर्धेत स्पर्धकांच्या हृदयाची गती नियंत्रणात आहे की नाही याचे निरीक्षण करून, त्या आधारे विजेत्याची निवड केली जाते. ज्या स्पर्धकाची हृदय गती सर्वांत स्थिर राहते, तो या स्पर्धेचा विजेता ठरतो. या स्पर्धेचा उद्देश लोकांना तणावापासून मुक्त करणे आणि त्यांना डिजिटल जगातून थोडासा दिलासा देणे हा आहे.

ही स्पर्धा का व्हायरल होत आहे?

आजच्या व्यग्र जीवनात जिथे लोक काही क्षणांसाठीही त्यांच्या मोबाईलपासून दूर राहू शकत नाहीत. अशा लोकांसाठी ही स्पर्धा ध्यान आणि शांतीची शक्ती शिकवण्याचा एक मार्ग आहे. या अनोख्या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जे पाहून युजर्स इतर देशांमध्येही ही स्पर्धा आयोजित करण्याची मागणी करत आहेत.

कोरियात अशा कार्यक्रमाची गरज का आहे?

दक्षिण कोरिया त्याच्या सर्वांत टफ वर्क कल्चरसाठी ओळखला जातो. या विकसित देशांत कामाचे तास सर्वाधिक आहेत. २०२३ मध्ये येथील सरकारने साप्ताहिक कामकाजाची वेळमर्यादा ६९ तासांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, त्याला प्रचंड विरोध झाला आणि शेवटी सरकारला त्याच्या निर्णयापासून मागे हटावे लागले.

अशा परिस्थितीत जीवनाला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्यासाठी या स्पर्धेची गरज स्थानिक कलाकारांना यांना वाटली. त्यामुळे २०२४ पासून या स्पर्धेची सुरुवात झाली. या स्पर्धेत १९ ते ३४ वयोगटातील तरुणांना सहभाग घेता येतो. कोरियन सरकारच्या सर्वेक्षणात असे आढळून आले की, गेल्या वर्षी तीनपैकी एकाने बर्नआउटचा अनुभव घेतला. यामागील कारणे म्हणजे ३७,६ टक्के करिअरची चिंता, २१.१ टक्के जास्त कामाचा दबाव, १४ टक्के कामाबद्दलची निराशा व १२.४ टक्के काम आणि आयुष्यातील असमतोल अशा अनेक गोष्टींपासून शांतता मिळावी यासाठी त्यांनी स्पेस आऊट स्पर्धेत सहभाग घेतला.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: South korea unique compitition 90 minutes of doing noting for the win sjr