आपली भारतीय संस्कृती पाहण्यासाठी परदेशातील बरीच लोकं भारतात येत असतात. यावेळी त्यांनी पाहिलेल्या गोष्टी किंवा खाल्लेले काही पदार्थ यांचे व्हिडिओ ते सोशल मीडियावर शेअर करतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत आहे. जो भारतीयांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. या व्हिडिओमध्ये एक दक्षिण कोरियाची एक महिला १० वेगवेगळ्या प्रकारच्या पाणीपुरी खाताना दिसत आहे.
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर मेगी किम या महिलेने शेअर केला आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मेगी साडी नेसून पाणीपुरी विक्रेत्याच्या स्टॉलबाहेर उभी असल्याचे दिसत आहे. ती यावेळी ती चिंच, हिंग, जलजीरा, पुदिना, लसूण आणि इतर फ्लेवर्स पाणीपुरी खाताना दिसत आहे. यासोबतच ती प्रत्येक पाणीपुरीला त्याच्या चवीनुसार रेटिंग देखील देत आहे.
येथे पाहा व्हिडिओ
( हे ही वाचा: ‘हा’ आहे जगातील शेवटचा रस्ता, जिथे लोकांना एकट्याने जाण्यास परवानगी नाही)
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला या व्हिडिओला आतापर्यंत भरपूर व्ह्यूज मिळाले आहेत. तसंच ७३ हजार लोकांनी या व्हिडिओला लाईकही केले आहे. यासोबतच याला अनेक कमेंटही करण्यात आल्या आहेत. “तुम्हाला ओरिजनल पाणीपुरी खाण्याची गरज आहे, ज्यात विक्रेत्याचा घामही मिसळला जातो.” तिसरी व्यक्ती म्हणाली, “लसूण १०/१०असेल, मला माहित होते.” चौथा म्हणाला, चिंच फ्लेवर पाणीपुरीला न्याय द्यावा”