SpaceX हे जगातलं सर्वात शक्तिशाली रॉकेट उड्डाणानंतर अवघ्या चार मिनिटात फुटलं आहे. स्पेसएक्स स्टारशिप कॅप्सूल उड्डाणानंतरच्या तीन मिनिटात रॉकेट बूस्टरपासून वेगळं होणार होतं. मात्र तसं काहीही घडलं नाही अवघ्या चार मिनिटात या रॉकेटचा स्फोट झाला आणि आकाशात धुराचे लोट आणि आगीचे लोळ पाहण्यास मिळाले. ट्विटरवर यासंदर्भातले व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
महत्त्वाची बाब ही आहे की असं मानलं जात होतं की या स्टारशिप रॉकेटच्या मदतीनेच एक दिवसस माणूस मंगळावर स्वारी करेल. मात्र एलॉन मस्क यांनी लाँचिंगच्या दरम्यान स्टारशिपमध्ये स्फोट होण्याची शक्यता ५० टक्के आहे असं म्हटलं होतं.
मिळालेल्या माहितीनुसार स्टारशिप हे एक रियुजेबल रॉकेट होतं. या रॉकेटचे दोन भाग होते. पहिला पॅसेंजर भाग ज्या भागात प्रवासी असणार होते. तर दुसरा भाग होता तो म्हणजे हेवी रॉकेट बूस्टरचा. या पूर्ण रॉकेटची उंची १२० मीटर अर्थात सुमारे ३९४ फूट एवढी होती. तर वजन ५० लाख किलोग्रॅम होतं. याच रॉकेटचा स्फोट झाला आहे.
माणसाला चंद्र आणि मंगळावर घेऊन जाण्यासाठी SpaceX Starship हे अत्यंत उपयुक्त ठरेल असं मानलं जात होतं. मात्र लाँचिंगनंतर अवघ्या चार मिनिटात हे रॉकेट फुटलं आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता स्पेसएक्स रॉकेट टेक्सासच्या बोकाचिका प्रायव्हेट स्पेसबेसहून लाँच करण्यात आलं. मात्र उड्डाणानंतर अवघ्या चार मिनिटात या रॉकेटचा स्फोट झाला. एलॉन मस्क यांच्या मालकीची कंपनी असलेल्या SpaceX ने हे म्हटलं आहे की हे रॉकेट फुटलं असलं तरी त्याचं लाँचिंग झालं हेच आम्ही मोठं यश मानतो.
स्पेसएक्स कंपनीने हेदेखील म्हटलं आहे की आज आम्ही अपयशी ठरलो असलो तरीही येत्या काळात आम्हाला यश मिळेल. आज आम्हाला जो अनुभव आला त्यातून आम्ही अनेक गोष्टी शिकलो आहोत. स्टारशिपची विश्वासर्हता वाढेल यासाठी आम्ही त्या अनुषंगाने प्रयत्न करणार आहोत.