Spain menstrual leave law: प्रत्येक स्त्रीला दर २७ ते ३० दिवसांनी मासिक पाळी येते. वयाच्या बारा-तेराव्या वर्षी सुरु झालेले मासिक पाळीचे चक्र वयवर्ष पंचेचाळीस ते पन्नास झाल्यावर थांबते. या काळामध्ये खूप त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे ठराविक दिवसांमध्ये महिलांना विश्रांतीची गरज असते. आधी घरांमध्ये महिलांना या काळामध्ये आराम करण्याची सोय असे. हळूहळू काळ बदलला. महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करु लागल्या, ऑफिसला जाऊ लागल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मासिक पाळीच्या चार-पाच दिवसांमध्ये महिलांना प्रचंड वेदना होत असतात. अनेकदा यांचा परिणाम त्यांच्या कामावर किंवा वैयक्तिक आयुष्यावर देखील होतो. या काळामध्ये त्यांना काम करताना अधिकचा ताण सहन करावा लागतो. या संदर्भामध्ये स्पेन या देशाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. स्पेनच्या संसदेमध्ये मंजूर झालेल्या कायद्यानुसार, त्या देशातील महिलांना मासिक पाळीच्या दिवसांमध्ये रजा घेता येणार आहे. या कालावधीमध्ये पगारी रजा देण्याचा निर्णय तेथे घेण्यात आला आहे.

आणखी वाचा – ‘ती’ने मासिक पाळीलाच पत्र लिहिले!

तेथील संसदेमध्ये या कायद्याच्या ठरावाला १८५ पैकी १५४ मते मिळाली आहेत. हा ठराव मंजूर झाल्यानंतर मासिक पाळीच्या काळात महिलांना सुट्टी देणाऱ्या मोजक्या देशांमध्ये स्पेनचा समावेश झाला आहे. तसेच असा ऐतिहासिक निर्णय घेणारा स्पेन हा पहिला युरोपियन देश बनला आहे. जपान, इंडोनेशिया आणि झांबिया अशा काही देशांमध्ये या मासिक पाळीच्या सुट्टीसंबंधित कायदे फार आधी तयार करण्यात आले आहेत. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे मंत्री इरेन मोंटेरो यांनी म्हटले आहे. जगभरातून स्पेनद्वारे घेतलेल्या भूमिकेचे कौतुक होत आहे.

आणखी वाचा – मासिक पाळी सुसह्य करायचीय? मग या टिप्स वाचाच!

दरम्यान मासिक पाळीच्या काळामध्ये महिलांना पगारी रजा देण्याच्या ठरावाला स्पेनमधील काही संघटनांनी विरोध दर्शवला आहे. UGT (Unión General de Trabajadores) ही तेथील सर्वात मोठी कामगार संघटना आहे. या संघटनेने या कायद्याचा विरोध केला आहे. या निर्णयामुळे कामाच्या ठिकाणी महिलांची प्रतिमा मलीन होऊ शकते असे मत या संघटनेने मांडले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Spain becomes first country in europe to pass menstrual leave law yps