व्यसन म्हणजे एखादी अशी सवय कि ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर शारीरिक, मानसिक व सामाजिक त्रास होत असल्याची जाणीव होत असूनही त्यात बदल करणे शक्य होत नाही.व्यसन हे एक विनाशकारी वादळ आहे. या वादळात आज आपल्या देशातील युवा पिढी अडकलेली आहे. या विनाशकारी वादळाला आत्ताच जर थांबवलं नाही, तर कितीतरी कोवळे युवक आणि युवती नव्या शतकाचा पहिला उगवता सूर्य बघण्यासाठी शिल्लकच राहणार नाहीत. मात्र कितीही सांगितलं तरी काही लोक हे थांबवत नाही. दरम्यान अशाच लोकांसाठी एका ठिकाणी स्पर्धा भरवण्यात आली आहे. पान मसाला खवय्यांसाठी आता एक स्पर्धा आयोजित केली आहे. अन् लक्षवेधी बाब म्हणजे या स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला बक्षिस मिळणारच आहे. या अनोख्या स्पर्धेचा बॅनर सध्या व्हायरल होत आहे. या स्पर्धेत मिळणाऱ्या बक्षिसांची यादी पाहून खरंच तुम्ही सुद्धा अवाक् व्हाल.
या पोस्टरवर तुम्ही पाहू शकता, पहिले बक्षिस, दुसरे बक्षिस आणि तिसरे बक्षिस लिहले आहे. मात्र हे बक्षिस काय आहे हे वाचून तुम्हीही शॉक व्हाल. कारण पहिलं बक्षिस आहे मृत्यू, दुसरं बक्षिस आहे कर्करोग आणि तिसरं बक्षिस भूक न लागने. पुढे लिहलं आहे बक्षिस वितरण हे यमराज यांच्या हस्ते, प्रवेश फी भरण्याचे ठिकाण पानपट्टी तर बक्षिस वितरणाचे ठिकाण हे गावातील स्मशान भूमी हे असणार आहे.
गुटख्यामुळे होणाऱ्या आजारांबद्दल माहिती देतात. पण व्यसनी लोकं काही ऐकायचं नावच घेत नाहीत. परिणामी या लोकांना त्यांच्याच भाषेत सांगण्यासाठी एका स्पर्धेची जाहिरात तयार करण्यात आली आहे.
पाहा स्पर्धेचं पोस्टर
हेही वाचा >> खतरनाक! पिसाळलेला बैल थेट घरात शिरला; बायकांना उडवलं, थरारक घटनेचा VIDEO व्हायरल
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण चर्चा करत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर @vinodprajapat384• नावाच्या वापरकर्त्याने शेअर केला आहे, ज्याला आतापर्यंत ४० हजाराहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.व्हिडीओ नेमका कोणत्या ठिकाणचा आहे हे स्पष्ट झालं नाही.