Republic Day 2024 Google Doodle: देशभरात ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. त्यानिमित्त राजधानी नवी दिल्लीसह देशभरात अनेक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. दरम्यान, सर्च इंजिन गूगलने भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीयांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. गूगलने यानिमित्ताने एक अनोखे डूडल शेअर केले आहे; ज्यात प्रजासत्तक दिनाच्या परेडची झलक दिसत आहे.

गूगलने आपल्या डूडलमधून भारताचा ब्लॅक अॅण्ड व्हाईट टीव्हीपासून ते स्मार्टफोनपर्यंतचा प्रवास दाखवला आहे. त्यातूनच प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर पार पडणारी परेड गेल्या काही दशकांमध्ये पडद्यावर कशी दिसली हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. डूडल्स हा एक प्रकारच्या रेखाचित्राचा भाग आहे; ज्यामध्ये अगदी सर्वांत मोठ्या घटना किंवा विषयांचे चित्रण अगदी सोप्या पद्धतीने केले जाते.

Indian Army Day 2025 Wishes in Marathi| Happy Indian Army Day 2025
Indian Army Day 2025 Wishes : लष्कर दिनाच्या द्या भारतीय जवानांना हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Kark Rashi mata lakshmi
कर्क राशीमध्ये निर्माण होईल डबल लक्ष्मी राजयोग! ‘या’ ३ राशीचे भाग्य उजळणार, माता लक्ष्मीच्या कृपेने प्रत्येक काम मिळणार अपार यश
ulta chashma
उलटा चष्मा : शीर्षस्थांना खूश करण्याच्या नादात…
Amazon Flipkart announce Republic Day sale 2025
ॲमेझॉन, फ्लिपकार्टचा ‘Republic Day sale’ कधी होणार सुरू? काय असणार ऑफर्स; जाणून घ्या एका क्लिकवर
jijau Jayant 2025
जिजाऊंच्या जयघोषाने मातृतीर्थ दुमदुमले, सिंदखेडराजात पाऊण लाख शिवभक्त
balmaifal story for children
बालमैफल : मी… अनादी, अनंत!
What is Kinkrant| Sankrant and Kinkrant Difference
Kinkrant 2025: किंक्रांत म्हणजे काय? का पाळला जातो हा दिवस; जाणून घ्या संक्रांत आणि किंक्रांत यातील फरक

गेल्या काही वर्षांमध्ये आपण कॅथोड रे ट्युबसह मोठ्या टेलिव्हिजन सेटपासून लहान टीव्ही आणि नंतर स्मार्टफोन्सकडे वळलो आहोत. या डूडलमध्ये दोन टीव्ही संच आणि एक मोबाइल फोन दाखवण्यात आला आहे. त्यामध्ये Google मधील ‘G’ हे अक्षर पहिल्या ॲनालॉग टेलिव्हिजन सेटवर डावीकडे लिहिले आहे; तर दोन ‘O’ अक्षरे म्हणजे दोन टीव्ही स्क्रीन म्हणून दाखविल्या आहेत आणि ‘G’, ‘L’ व ‘E’ ही उरलेली तीन इंग्रजी अक्षरे उजवीकडे दाखवलेल्या मोबाईल हॅण्डसेटच्या स्क्रीनवर लिहिलेली आहेत. पहिल्या टीव्ही स्क्रीनवर परेडमधील एक दृश्य ब्लॅक अॅण्ड व्हाईट रंगात दाखविण्यात आले आहे; तर दुसऱ्या रंगीत स्क्रीनवर उंटाची स्वारी दाखवून तंत्रज्ञानाचा प्रवास ठळकपणे दाखविण्यात आला आहे.

National Flag on Apparel : राष्ट्रध्वजाच्या प्रिंटचे टी-शर्ट, कुर्ता, साडी परिधान करण्यापूर्वी वाचा ‘हे’ नियम; अन्यथा…

या डूडलवर लिहिले आहे की, “हे डूडल भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त तयार करण्यात आले आहे, १९५० मध्ये भारतानाने संविधान स्वीकारले आणि राष्ट्राने स्वतःला सार्वभौम, लोकशाही आणि प्रजासत्ताक घोषित केले, हे डूडल त्यादिवसाची आठवण करुन देते.

त्यात म्हटले आहे, “आजचे डूडल पाहुणे कलाकार वृंदा झवेरी यांनी तयार केले आहे, जे विविध प्रकारच्या स्क्रीनवर गेल्या दशकांतील प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे चित्रण करते.”

Story img Loader