Puneri pati: पुणेकर त्यांच्या वैशिष्टपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या ह्या नेहमी चर्चेच्या विषय ठरतात. पुणे म्हटलं की अर्थात पुणेरी पाट्या लक्षात येतातच. पुणेरी पाट्या या अनेकदा चर्चेचा विषय बनतात. कधी वाद तयार करतात तर कधी वादावर भाष्य करतात. कधी चांगला संदेश देतात तर कधी चांगलाच संदेश पोहोचवतात. अशीच एक पुणेरी पाटी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बिना व्यक्त होता आपली मतं ठामपणे आणि थेट मांडण्याचं पुणेकरांचं माध्यम म्हणजे पुणेरी पाटी.

सध्या मुलांच्या लग्नाचा विषय फारच गंभीर होत चाललाय. हल्ली मुलांना मुली मिळणं कठीण झालंय. स्वभाव, कुटुंब व अनुरूपता न पाहता शेती-नोकरी, पगार, गाडी, स्वतःच घर आणि कुटुंबातील कमी सदस्यसंख्या यावरच हल्ली लग्न ठरत असतात. नणंद, दिर नको, सासू-सासऱ्यांपासून नवरा वेगळा हवा, त्याचा पुण्या-मुंबईत फ्लॅट हवा, अशा अपेक्षा सध्या मुलींसह पालकांकडून व्यक्त होत आहे. ‘असलाच नवरा पाहिजे हं…’ अशा मानसिकतेच्या मुलींमुळे अनेक मुले लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान असाच एक वैतागलेला तरुण पोस्टर घेऊन थेट चौकात पोहचला आहे. या पोस्टरवर असं काही लिहलंय की वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल.

Ramesh Bidhuri on Delhi CM Atishi
Ramesh Bidhuri : “दिल्लीच्या रस्त्यांवर हरिणीप्रमाणे…”, भाजपाच्या रमेश बिधुरींचं पुन्हा मुख्यमंत्री आतिशी यांच्याबद्दल बेताल वक्तव्य
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Viral video of a song sung by a school girl is currently going viral on social media
VIDEO: “कितीदा नव्याने तुला आठवावे…” शाळकरी विद्यार्थीनीचा आवाज ऐकून शिक्षकही झाले थक्क; सूर असा की अंगावर येतील शहारे
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
tripti dimri aashiquie 3 exit anurag basu
बोल्ड भूमिकांमुळे तृप्ती डिमरीचा Aashiqui 3 मधून पत्ता कट? दिग्दर्शक प्रतिक्रिया देत म्हणाला, “तिलाही हे…”
car is going viral on social media because of the quotes written on its front funny Photo goes viral
PHOTO: दोस्तांचा नादच नाय! मित्र पोलीस म्हणून कारवर लिहलं असं काही की पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल

लग्नासाठी मुलाकडून प्रचंड अपेक्षा करणाऱ्या मुलींना या पुण्याच्या तरुणानं चोख उत्तर दिलंय. भर चौकात तरुण हातात पोस्टर घेऊन उभा आहे. येणारे जाणारे सगळे लोक हे पुणेरी पोस्टर पाहून थांबत आहेत. आता तुम्ही म्हणाल असं काय लिहलंय या पोस्टरवर ? तर या तरुणानं या पोस्टरवर “पगाराचा अकडा आणि जमिनीचा तुकडा यावर अवलंबून असते बायको मिळेल की नाही” असा आशय लिहला आहे.

मुलींच्या अपेक्षा वाढल्या

जो तरुण पुण्यामुंबई सारख्या शहरात नोकरीला आहे .अशा तरुणांना आपली मुलगी द्यावी असं लोकांना वाटू लागले आहे.सध्याची लग्नसंस्था पैशाभोवती फिरणारी मागील काही दिवसांत तरुणांना मुलगी मिळण्याचे वास्तव भयानक झाल्यामुळे काही लोकांनी मुलींच्या कुटुंबियांना पैसे देण्याची प्रथा सुरू केली आहे. ही प्रथा आजही खेड्यापाड्यात सर्रासपणे सुरू आहे. ही बाब तरुणांसाठी जास्तच त्रासदायक ठरत आहे.विवाहाची जबाबदारी पडण्यापूर्वी करिअर घडविणे हल्लीच्या मुलामुलींना योग्य वाटते. मग शिक्षण, नोकरी, स्पर्धा परीक्षांच्या नादात त्यांच्याही नकळत विवाहयोग्य वय वाढत जाते. नोकरी मिळाल्यानंतरही तीत स्थैर्य हवे अशा अपेक्षेने काही मुले स्वतःच उशिरा बोहल्यावर चढतात.

पाहा पाटी

हेही वाचा >> महिलांनो सावधान! तुम्हीही पालकची भाजी खाताय का? थांबा…’हा’ VIDEO पाहाल तर झोप उडेल

ही पुणेरी पाटीची पोस्ट beingpunekarofficial या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आली असून हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट केलीय की,कशाला जखमेवर मीठ चोळतोय. तर आणखी एकानं म्हंटलंय, हे फार गंभीर आहे.

Story img Loader