Specially Abled Girl Viral Video : सोशल मीडियावर एकाहून एक जबरदस्त डान्सचे व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. पतली कमरीया मोरे या गाण्यावर भन्नाट डान्स करण्याचं फॅडही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. डीजेच्या तालावर थिरकायला अनेकांना आवडत असेल. पण एखाद्या लोकप्रीय गाण्यावर जबरदस्त ठुमके लागावत लोकांची वाहवा मिळवण्यात काही जण शातीर असतात. पण एका अपंग तरुणीच्या सुंदर डान्सने लाखो नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. दोन हात नसतानाही या तरुणीने कद्दु कटेगा गाण्यावर जबरदस्त डान्स करून अनेकांना आश्चर्याचा धक्काच दिला आहे. आर राजकुमार यांच्या सिनेमातील कद्दु कटेगा गाण्यावर तरुणीने केलेला डान्स इंटरनेटवर तमाम नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. सोशल मीडियावर लोकप्रीय असणारी तरुणी मेघा घिमीरीने अपंग असतानाही सुंदर डान्स सादर केल्यानं नेटकऱ्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
या व्हिडीओला मिळाले ६० लाखांहून अधिक व्यूज, पाहा जबरदस्त व्हिडीओ
मेघा घिमीरीने तिच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर कद्दु कटेगा गाण्यावर केलेल्या सुंदर डान्सचा व्हिडीओ शेअर केला आहे. सुंदर आऊट फीट मध्ये नटलेल्या मेघाने जबरदस्त ठुमके लगावत तमाम प्रेक्षकवर्गा टाळ्यांचा गजर वाजवण्यास भाग पाडलं आहे. तिचा डान्स पाहून नेटकऱ्यांच्या मनालाही भुरळ पडली आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केल्यानंतर आतापर्यंत या व्हिडीओला ६० लाखांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. नेटकऱ्यांचा या व्हिडीओला उदंड प्रतिसाद मिळाला असून सुंदर प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. कमेंट सेक्शनमध्ये खूप सारे हर्ट इमोजी पाठवून नेटकऱ्यांनी तरुणीच्या डान्सला पसंती दर्शवली आहे.
इथे पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, “तुम्ही अपंग आहात, पण तुम्ही किती सुंदर आहात.” दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटलं, “तुम्ही खूप सुंदर आहात, मी तुमचा खूप मोठा चाहता आहे, मॅम.” तसेच अन्य एका नेटकऱ्याने हर्ट इमोजी पाठवत म्हटलं, “देवाने तुम्हाला आशिर्वाद द्यावा.” ,सोशल मीडियावर अनेक तरुणींचे डान्सचे व्हिडीओ शेअर होतात. पण या अपंग तरुणीने नेटकऱ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. दोन हात नसनाही इतका सुंदर डान्स करणाऱ्या तरुणीवर तिच्या चाहत्यांन स्तुतीसुमने उधळली आहेत. या तरुणीच्या डान्स व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत असून नेटकऱ्यांचा जबरदस्त प्रतिसाद या व्हिडीओला मिळत आहे.