जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu and Kashmir) हंदवाडा येथील एका मुलाची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. या मुलाचं नाव आहे परवेझ. अगदी लहान वयात एका भीषण आगीच्या अपघातात डावा पाय गमावला. पण त्याने आपली स्वप्न सोडलेली नाहीत. परवेझ सध्या सरकारी हायस्कूल, नौगाम येथे नवव्या वर्गात शिकत आहे. तो रोज शाळेत २ किलोमीटर एका पायावर चालत जातो.

१४ वर्षांचा परवेझ सांगतो की, “मी एका पायावर समतोल राखून दररोज सुमारे दोन किलोमीटर चालतो. रस्ते चांगले नाहीत. जर मला कृत्रिम अवयव मिळाले तर मी चालू शकेन. माझे आयुष्यात खूप काही मिळवायचे स्वप्न आहे.” समाजकल्याण विभागाने व्हीलचेअर दिली होती, पण गावातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे ती कधीही वापरली गेली नाही. पुढे तो सांगतो की, “माझ्या शाळेचा रस्ता खराब झाला आहे. शाळेत पोहोचल्यानंतर मला खूप घाम येतो कारण मला चालणे कठीण होते. शाळेत पोहोचल्यानंतर मी प्रार्थना करतो. मला व्हॉलीबॉल, कबड्डी आणि क्रिकेट आवडते. मला आशा आहे की सरकार मला माझे भविष्य घडविण्यात मदत करेल. माझी स्वप्नं पूर्ण करण्याची जिद्द माझ्याकडे आहे.”

(हे ही वाचा: स्विगी डिलीव्हरी बॉयला पोलीस हवालदाराकडून मारहाण; Video Viral झाला अन्…)

(हे ही वाचा: ‘ही’ व्यक्ती १० महिन्यांपासून वीज विभागाच्या कार्यालयात जाऊन वापरतेय मिक्सर, कारण…)

कृत्रिम अवयव देण्याची सरकारला विनंती

आपले अनुभव पुढे सांगताना, परवेझ म्हणाला, “माझ्या मित्रांना चांगले चालता येते पण मी नीट चालू शकत नाही याचे मला वाईट वाटते. तथापि, मला शक्ती दिल्याबद्दल मी अल्लाहचे आभार मानतो. मी सरकारला मला मदत करण्याची विनंती करतो. मी कृत्रिम अवयव देण्याची विनंती करतो. एखादे अवयव किंवा इतर कोणतेही वाहतुकीचे साधन असावे ज्यामुळे माझा शाळेत आणि इतर ठिकाणी प्रवास सुलभ होईल. ऑपरेशन एका हॉस्पिटलमध्ये केले ज्यासाठी माझ्या वडिलांना मोठी रक्कम मोजावी लागली. वडिलांना माझ्या उपचारासाठी त्याची मालमत्ता विकून टाकावी लागली. “

Story img Loader