प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटानंतर आता अभिनेता कमल हासन यांच्या ‘विक्रम’ चित्रपटाची क्रेझ लोकांमध्ये वाढताना दिसून येतेय. विक्रम या चित्रपटामधील  ‘पथाला-पथाला’ हे गाणं सर्वांच्याच पसंतीचं ठरत असून अगदी लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सारेच जण या गाण्यावर वेगवेगळे व्हिडीओ तयार करताना दिसून येत आहेत. एका दृष्टीहीन व्यक्तीनं चक्क बादली वाजवत हे गाणं गायलंय. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागलाय. लोक हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर करताना दिसून येत आहेत. 

कमल हासनचा ‘विक्रम’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. हा आधीच एक ब्लॉकबस्टर हिट चित्रपट ठरलाय आणि प्रेक्षक तसेच समीक्षकांनी या चित्रपटाबद्दल आश्चर्यकारक गोष्टी सांगितल्या आहेत. या चित्रपटातलं ‘पथाला पथाला’ हे गाणं सध्या चांगलंच गाजतंय. या गाण्याचे बोल जरी समजत नसले तर लोकांवर या गाण्याची जादू चांगलीच पसरलीय. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका दृष्टीहीन व्यक्तीने चक्क बादलीवर वाजवत हे गाणं गायलंय. तो अतिशय उत्तम पद्धतीने बीट्सवर बादली वाजवत हे गाणं सादर केलंय. 

आणखी वाचा : …अन् खड्ड्यात पडले स्कुटीस्वार पती-पत्नी, हा धक्कादायक VIRAL VIDEO पाहून हादरून जाल

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : भारतीय कोब्राने गिळला ५ फूट लांबीचा रसेल वायपर साप, पाहा हा भयानक VIRAL VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ KamalHaasanTeam नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. त्यानंतर तो सोशल मीडियावर अगदी आगीसारखा पसरलाय. हा व्हिडीओ पाहून लोक या दृष्टीहीन व्यक्तींच्या आवाजाचं कौतुक करताना दिसून येत आहेत. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला ४१ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर साडे चार हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओ लाईक केलंय. अनेकांनी या व्हिडीओखालील कमेंट सेक्शन कौतुकाने भरून काढलाय. काही लोकांनी या दृष्टीहीन व्यक्तींच्या टॅलेंटचं कौतुक केलंय तर काहींनी या दृष्टीहीन व्यक्तीला एकदा कमल हासन यांची भेट घेण्याची संधी द्यावी, असं म्हटलंय. तर काही लोकांनी त्याच्या गाण्याचं फुल वर्जन आहे का? असं देखील विचारलंय.