Speeding Card Crushes 2 Woman And Child : हैदराबाद तेलंगणात एक धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. दोन महिला एका लहान मुलासोबत तेलंगणाच्या हैदरशकोट मुख्य रस्त्यावरून जात असताना लाल रंगाच्या एका कारने त्यांना धडक दिली. भरधाव वेगाने जाणाऱ्या या कारची जोरदार धडक लागल्याने तिघांचाही जागीच मृत्यू झाला. या महिला मुलासोबत मॉर्निंग वॉकला जात असताना ही दुर्देवी घटना घडली. या भयानक अपघातामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. हा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नक्की वाचा – ८ महिन्यांपासून महिलेचे अंतर्वस्त्र चोरायचा, सापळा रचला पण चोरट्याचा चेहरा पाहताच महिलेला बसला धक्का, कारण…

इथे पाहा व्हिडीओ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शास्त्रीनगर कॉलनीत एक महिला आणि तिचा मुलगा राहत होता. कारचा वेग प्रचंड असल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि हा अपघात घडला. नरसानीगी पोलिसांनी या अपघाताची नोंद केली असून पुढील तपास सुरु आहे. दरम्यान, या भरधाव कारच्या धडकेत या तिघांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मद्यपान करून वाहनचालक वाहने चालवतात का? असा प्रश्न या अपघाताच्या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.