Car-Bike Accident Viral Video : दिल्ली-खांजावाला हिट अॅंड ड्रॅग प्रकरण ताजं असतानाच एका नवीन अपघाताच्या घटनेनं खळबळ माजवली आहे. हरयाणाच्या गुरुग्राममध्ये रस्त्यावरून भरधाव वेगानं जाणाऱ्या कारने दुचाकील जोरदार धडक दिली. हा अपघाता इतका भीषण होता की कारने धडक दिलेली दुचाकी चार किमीर्यंत फरफटत गेली. गुरुग्रामच्या सेक्टर ६२ मध्ये ही घटना घडली. कारने दुचाकीला धडक दिल्यानंतर दुचाकी कारच्या ग्रीलला अडकली. भरधाव वेगानं जाणाऱ्या कारमुळं रस्त्यावर आगीच्या ठिणग्या पडत होग्या. वाहनांच्या बर्निंगचा हा धक्कादायक व्हिडीओ कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दोन जणांचा जीव थोडक्यात वाचला, अशी माहिती समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“दुचाकीवरून प्रवास करत असताना पाठीमागून येणाऱ्या एका कारने धडक दिली. कारने जोरात धडक दिल्याने आम्ही दोघेही दुचाकीवरून खाली पडलो. अपघात इतका भीषण होता की, दुचाकी चार किमीपर्यंत फरफटत गेली. कारच्या पुढे असलेल्या ग्रीलला दुचाकी अडकल्याने रस्त्यावरुन भरधाव वेगानं जात असताना आगीच्या ठिणग्या उडत होत्या. कामवरुन घरी जात असताना हा अपघात झाला. कार चालक ड्रिंक अॅंड ड्राईव्ह करत होता. दुचाकी कारला अडकल्यानंतरही त्याने कारला रस्त्यावर थांबवलं नाही.

नक्की वाचा – भारत-पाकिस्तान सीमेवर तारांच्या कुंपणाला बिअरच्या बाटल्या का टांगतात? यामागचं कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

इथे पाहा व्हिडीओ

आम्ही कारचालकाना जोरजोरात ओरडून थांबवण्याचा प्रयत्न केला. पण त्याने दुर्लक्ष केलं आणि भरधाव वेगानं कार चालवतच राहिला . हा अपघात झाल्यानंतर आम्हाला गंभीर दुखापत झाली नाही. आम्ही अपघाताचा व्हिडीओ कॅमेरात कैद केला, अशी माहिती दुचाकीस्वारांनी कार चालकाविरोधात तक्रार दाखल करताना पोलिसांना दिली. “आम्ही फरिदाबादमध्ये राहणाऱ्या आरोपी सुशांत मेहताला अटक केलीय. आरोपीची कार जप्त करण्यात आली आहे. सेक्टर ६३ मध्ये एका खाजगी कंपनीत आरोपी सुशांत नोकरी करतो”, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.