अपघात टाळण्यासाठी गाडी कमी वेगात चालवा असं वारंवार सांगितलं जातं. पण, एका भरधाव कारचालकाच्या हलगर्जीपणामुळे एक मोठी दुर्घटना घडली. गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पावसात रस्त्यावर वेगवेगळ्या अपघाताच्या घटना मोबाईलच्या माध्यमातून पाहत असतो. बऱ्याचदा पावसाळ्यात गाड्या रस्त्यावरून घसरल्याच्या घटना घडत असतात. नेमक्या अशाच एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. या व्हिडीओमध्ये एक कार भरधाव वेगात जात असताना अचानक रूग्णवाहिकेच्या समोरूनच घसरली. हे दृश्य पाहून अंगावर काटा येईल, हे मात्र नक्की.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये या अपघाताची भीषणता लक्षात येईल. अतिवेगाने वाहन चालवणाऱ्या कार चालकामुळे हा अपघात घडला असून याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. हा व्हिडीओ केरळमधला असल्याचं सांगण्यात येतंय. गेल्या काही दिवसांपासून दमदार पाऊस सुरूये. या काळात वाहन चालवताना विशेष काळजी घेणं महत्त्वाचं आहे. विशेषतः जेव्हा रस्ता निसरडा आणि ओला असतो. पण काही महाभाग असे असतात, त्यांना या सर्व गोष्टींचा विसर पडतो आणि मग त्यांचा हा निष्काळजीपणा महागात पडतो.

आणखी वाचा : माकडाच्या पिल्लाची शिकार करण्यासाठी बिबट्याने झाडावरून उडी मारली, VIRAL VIDEO पाहून चक्रावून जाल

अॅम्ब्युलन्सवर चिकटवलेल्या डॅशकॅमवरून घेतलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रूग्णवाहिका ज्या लेनमध्ये आहे त्याच लेनमध्ये एक पांढऱ्या रंगाची कार वेगाने जात आहे. मुसळधार पाऊस असूनही सेडान वेगात जाताना दिसत आहे. ही कार आजुबाजुने जाणारे अवजड ट्रक आणि दुचाकी यांच्यामध्ये कट करून ट्रॅफिकमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना दिसून येतेय. काही क्षणांनी गाडी थोडी डावीकडे गेलेली दिसते. इथेच सगळा गोंधळ झाला. मुसळधार पावसात डावीकडे साधारणपणे लहान लहान डबके पाण्याने भरतात. या डबक्यांमुळे टायर त्यांची पकड गमावतात आणि घसरतात. या व्हिडीओमधल्या पांढऱ्या कारच्या बाबतीत तेच घडलं.

आणखी वाचा : बाबो! असलं वादळ पाहून अंगावर काटा येईल, कॅनडातल्या चक्रीवादळाचा VIDEO VIRAL

या घटनेत कार ३६० अंश फिरण्यापूर्वी रस्त्यावरील पकड गमावते आणि रस्त्यावरून घसरते. हे भयानक वळण घेताना कार थेट डिव्हायडरला जाऊन आदळते. धक्कादायक बाब म्हणजे या कारच्या मागोमाग एक रूग्णवाहिका देखील जात होती. पण वेगाने येणाऱ्या कारपासून रूग्णवाहिकेच्या चालकाने सुरक्षित अंतर ठेवल्याने मोठी दुर्घटना टळली. याबद्दल रूग्णवाहिका चालकांचं कौतुक करण्यात येतंय. बेजबाबदारपणे गाडी चालवल्याबद्दल अनेक युजर्सनी वेगवान कारच्या चालकावर टीका केली आणि कायदेशीर कारवाईची मागणी केली.

आणखी वाचा : त्र्यंबकेश्वर मंदिरात चमत्कार! शंकराच्या पिंडीवर जमा झाला बर्फ, पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : ‘सुपरफास्ट’ तिकीट बुक करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याचा VIDEO VIRAL

अनेकांनी ABS (अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम) आणि EBD (इलेक्ट्रॉनिक ब्रेक डिस्ट्रिब्युशन) सारख्या सिक्यूरिटी फीचर्सचे महत्त्व सांगितले जे ओल्या पृष्ठभागावरही कारला स्थिरता राखण्यास मदत करतात. मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यांत टायर गेल्यामुळे पांढऱ्या रंगाच्या कारची पकड सुटली. या घटनेला हायड्रोप्लॅनिंग म्हणतात. रस्त्यावर दिसणार्‍या पाण्यामुळे टायर्सचे चर डांबरी रस्त्यावर पकड ठेवण्यात अपयशी ठरतात आणि मग रस्त्यावरून घसरतात.