Car Accident Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका कारच्या व्हिडीओनं अनेकांचा थरकाप उडवला आहे. हायवेवरून सुसाट धावणारी कार चालकाचा नियंत्रण सुटल्याने थेट जिममध्ये येऊन ट्रेडमिलला धडकली. धक्कादायक बाब म्हणजे, कारची धडक ट्रेडमिलवर वर्कआऊट करणाऱ्या व्यक्तीला धडकली. कारच्या अपघाताचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. एका ट्वीटर युजरने थरकाप उडवणाऱ्या या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. लाल रंगाची कार चालकाचा ताबा सुटल्याने थेट जिममध्ये येऊन धडकली असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. जिममध्ये वर्कआऊट करणाऱ्या व्यक्तीला या अपघातात किरकोळ दुखापत झाल्याचं समजते आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ट्वीटरवर शेअर केलेल्या या व्हिडीओला हजारो नेटकऱ्यांनी लाईक केलं असून १.४ मिलियनहून अधिक व्यूज या व्हिडीओला मिळाले आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांचा थरकाप उडाला असून भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षाव नेटकऱ्यांनी केला आहे. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलंय, हा व्हिडीओ पाहून फायनल डेस्टिनेशन फ्रॅंचायची चित्रपटाची आठवण झाली.हा अपघात अमेरिकेतील लॉस एंजेल्सच्या जिममध्ये एप्रिल २०१९ मध्ये झाला होता. सॅम्यूअल किवाज असं जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. ब्रेक फेल झाल्याने महिला चालकाचं कारवरून नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाला असल्याचं बोललं जात आहे.

नक्की वाचा – Video : पोहता यावं म्हणून आईने गोंडस बाळाला थेट स्विमिंग पूलमध्ये फेकलं अन् घडलं…

इथे पाहा व्हिडीओ

माध्यमांशी बोलताना सॅम्यूअलने अशी माहिती दिली की, “हा एक चमत्कार आहे की, मी जिवंत आहे. कारने अचानक जोरात धडक दिली. कारची धडक इतकी भीषण होती की, जिममधील काचांचा चक्काचूर झाला. भरधाव वेगानं येणाऱ्या कारने जिममध्ये धडक देऊन ट्रेडमिललाही टक्कर दिली. त्यामुळे मला किरकोळ दुखापत झाली. ब्रेक फेल झाल्याने कारचालकाचा ताबा सुटला आणि हा गंभीर अपघात झाला.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Speedy car hits breaks the gym doors and hit the man while doing workout on treadmill watch car accident shocking video captured in cctv camera nss