रस्त्यावर गाडी चालवत असताना आपलं सपूर्ण लक्ष समोर असलं पाहिजे. हे माहित असूनही माणसं अनेकदा चुका करतात. त्याचबरोबर इतरांचं सुद्धा नुकसान करीत असतात. विशेष म्हणजे दुसऱ्या गाडीला ओव्हरटेक करण्याच्या नादात आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. जगात रोज कुठे ना कुठे अपघात होत असतात. वर्षभरात जगात हजारो लोक रस्ते अपघातात मारले जातात. कधी स्वत:च्या चुकीने अपघात होतो, तर कधी समोरच्या वाहनाच्या चुकीने अपघात होतो. कधी ड्रायव्हरला डुलकी लागते, तर कधी गाडीवरील नियंत्रण सुटते. तर कधी गाडीचा वेग अधिक असल्याने अपघात घडत असतात. असाच एक अपघात ओव्हरटेक करताना झाला आहे. या अपघाताचा सीसीटिव्ही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पुढे जाण्याच्या नादात तरुण वाहनांना ओव्हरटेक करायला जातात. पण कधी कधी हा प्रयत्न अंगलट येतो. असाच कार अपघात झाला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका मोठ्या ट्रकच्या मागे रांगेत आहे. ज्यामध्ये एक कार ट्रकच्या मागे धावत असते, या ड्रायव्हरला कसा ही मार्ग काढून या ट्रकच्या पुढे जायचे असल्याचे या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. ट्रकच्या मागून जाताना कार चालकाचा कारवरील नियंत्रण सुटतो आणि कार रस्त्याखाली उतरली, ज्यानंतर ती पुन्हा रस्त्यावर येते, परंतू पुन्हा रस्त्याखाली उतरते. ज्यानंतर ती थेट रस्त्याखाली उतरुन एका झाडाला जोरदार आदळते आणि सगळीकडे धुराचे लोट होते. हा अपघात खूपच भयानक होता.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – VIDEO: अतिशहाणपणा नडला! वाघाने हात पकडला, पंजा खाल्ला, अतिरक्तस्रावामुळे अखेर तरुणाचा मृत्यू
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही गाडी ओव्हरटेक करताना दहावेळा विचार कराल. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे- प्रत्येक वेळी काही यमराजच रजेवर असतील असे नाही. हा व्हिडीओ लाखोवेळा पाहिला गेला आहे. लोक या व्हिडीओवर आपले कमेंट्स देखील करत आहेत.